Sangli : बेडगमध्ये आंबेडकरांची पाडण्यात आलेली कमान 'या' मार्गावर उभारणार; महेश कांबळेंनी दिली महत्त्वाची अपडेट

कमानप्रश्नी दुसरा लाँगमार्च बेडग (Bedag Gram Panchayat), माणगाव ते मुंबई मंत्रालय असा निघाला.
Bedag to Mumbai long march Buddhist community
Bedag to Mumbai long march Buddhist communityesakal
Updated on
Summary

जागानिश्चिती, निधी मंजुरी, किती दिवसांत कमान उभी राहील याची हमी मिळण्याकरिता १० ऑक्टोबरपर्यंत लाँगमार्च थांबवला आहे.

मिरज : राज्य शासनाने मिरज-बेडग-आरग रस्त्यावर कमान उभारणीसंदर्भात पत्र दिल्यामुळे शिवापूर येथे लाँगमार्च खेड थांबवला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रात मिरज-बेडग-आरग या मार्गावरील रस्ता क्रमांक ४५ बेडग येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने स्वागत कमान (Dr. Babasaheb Ambedkar Welcome Arch) उभारण्याचा शासनाने निर्णय घेतल्याचे सांगितले.

पत्रातील शासननिर्णय अभ्यासाअंती तपासून जागानिश्चिती, निधी मंजुरी, किती दिवसांत कमान उभी राहील याची हमी मिळण्याकरिता १० ऑक्टोबरपर्यंत लाँगमार्च थांबवला आहे. मागणीप्रमाणे कार्यवाही झाल्यास स्थगित करणार असल्याची माहिती डॉ. महेशकुमार कांबळे (Mahesh Kumar Kamble) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Bedag to Mumbai long march Buddhist community
Divorce Case : घटस्फोटानंतरही पुन्हा जोडले जातात राजा-राणीचे संसार; महिला आयोगाचं 'हे' पाऊल ठरतंय निर्णायक

कमानप्रश्नी दुसरा लाँगमार्च बेडग (Bedag Gram Panchayat), माणगाव ते मुंबई मंत्रालय असा निघाला. खेड शिवापूर येथे पोहोचल्यानंतर सांगलीचे उपजिल्हाधिकारी दीपक शिंदे, जिल्हा प्रशासनातील अधिकारी, पोलिस अधिकारी व मिरज सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी यांनी बौद्ध समाजबांधवांची भेट घेऊन जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी यांची स्वाक्षरी असलेले, मागण्या मान्य केलेले संयुक्त पत्र दिले.

Bedag to Mumbai long march Buddhist community
CM Siddaramaiah : 'धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करा'; मुख्यमंत्र्यांची केंद्र सरकारकडे शिफारस

सार्वजनिक बांधकाम विभाग (मुंबई)चे कक्ष अधिकारी सुरुची बदले यांनीदेखील आरग-बेडग-लिंगनूर या प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक ४५ वर कमान उभारण्यासाठी शासनाकडून नाहरकत देत आहोत, असे पत्रात नमूद केले आहे. पिंपरीत किंवळेमध्ये लाँगमार्चमधील सर्व बौद्ध समाजबांधव थांबले आहेत.

पदाधिकाऱ्यांच्या मनात शंका आहेत. त्यांच्या निरसनासाठी राज्य शासन व प्रशासनाला वेळ दिल्याचे कांबळे यांनी पत्राद्वारे सांगितले. बोलवाडचे माजी सरपंच सचिन कांबळे, मालगावचे तुषार खांडेकर, अरविंद कुरणे, स्वप्नील बनसोडे, सागर आवळे, एरंडोलीचे उमेश धेंडे, धनराज कांबळे उपस्थित होते.

Bedag to Mumbai long march Buddhist community
Kolhapur : संत गाडगेबाबांच्या चरित्राचे गाढे अभ्यासक हरपले; प्राचार्य भगत यांचं वयाच्या 91 व्या वर्षी निधन

‘माजी गृहमंत्र्यांच्या पुत्राची खाडेंकडून दखल; पण....’

तासगाव-कवठेमहांकाळ मतदार संघाच्या आमदार सुमन पाटील व माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांच्या सुरू असलेल्या उपोषणस्थळी पालकमंत्री सुरेश खाडे यांनी पहिल्याच दिवशी भेट दिली. मात्र, लाँगमार्चमध्ये सहभागी असलेल्या बेडग येथील बौद्ध बांधवांशी चर्चा करण्याची तसदी पालकमंत्र्यांनी दाखवली नाही, अशी टीका डॉ. कांबळे यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()