संशयित सुभाष याच्याकडून १० लाख रुपये किमतीचे सोने आणि १० लाख किमतीची मोटार जप्त केली आहे.
बेळगाव : माळमारुती पोलिसांनी (Malmaruti Police) आलिशान मोटारीतून येऊन चोरी करणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला जेरबंद केले आहे. त्याच्याकडून चोरीचा २० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शुक्रवारी (ता. ९) ही कारवाई करण्यात आली. नागराज सुभाष कचेरी (रा. कमलापूर, जिल्हा गुलबर्गा) असे संशयिताचे नाव असून, त्याच्यासोबत असलेले अन्य तिघे पसार झाले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष याने आपल्या आलिशान मोटारीतून (luxury Car) आपल्या मित्रांसमवेत फिरत येऊन महांतेशनगर, आंजनेयनगर आणि शिवबसवनगर परिसरात चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्याच्यासोबत असलेले हुसेन ऊर्फ सागर गायकवाड, अमूल व केत्या हे त्याचे तिघे मित्रदेखील या प्रकरणात सहभागी असून, ते फरारी झाली आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी विशेष पथक तयार केले आहे.
संशयित सुभाष याच्याकडून १० लाख रुपये किमतीचे सोने आणि १० लाख किमतीची मोटार जप्त केली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे. आंतरराज्य चोरट्यांना पकडण्याबाबत वरिष्ठांच्या सूचनेनुसार मार्केट विभागाचे एसीपी सोमगौडा यू. जी, माळमारुती पोलिस ठाण्याचे निरीक्षक जयम कालीमिर्ची यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक होन्नाप्पा तळवार, श्रीशैल हुलगेरी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.
यामध्ये एम. जी. कुरेर, चेन्नाप्पगोळ, बसू बस्त, चंद्रू चिगरी, के. बी. गौरानी, रवी बारीकर, शिवाजी चौहान, मारुती मादर, मल्लिकार्जुन गडवी, जगन्नाथ भोसले, बसवराज कल्लपनावर, तांत्रिक कर्मचारी रमेश अक्की आणि महादेव काशीद आदी कर्मचाऱ्यांनी भाग घेतला. शहर पोलिस आयुक्त याडा मार्टिन, उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांनी या पथकाचे अभिनंदन केले आहे.
सुभाष याने चोरीसाठी म्हणून आलिशान मोटारीचा वापर सुरू केला होता. या कारवर ‘प्रेस’ लिहून चोरीचे उद्योग सुरू होते. लक्झरी कार व त्यावर प्रेस लिहिण्यात आल्याने एखाद्या प्रसारमध्यमाशी संबंधित गाडी असावी म्हणून त्याला सूट मिळत होती. पोलिसदेखील ती कार अडवणार नाहीत, असा त्याचा अंदाज होता; पण अखेर तो खोटा ठरला. पोलिसांनी या वाहनाचीदेखील झडती घेतली, अन् चोरटा सापडला. या वाहनातूनच त्याने आपल्या अन्य तिघा मित्रांसोबत बेळगाव शहर परिसरात चोरी केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.