'मनोज जरांगे यांच्या उपोषणाची दखल घ्या, अन्यथा राज्यभर उद्रेक होईल'; मराठा समाज, संभाजी ब्रिगेडचा सरकारला इशारा

Manoj Jarange Agitation : ओबीसी प्रवर्गातून आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील गेली १३ महिने आंदोलन करत आहेत.
Manoj Jarange Maratha Reservation
Manoj Jarange Maratha Reservationesakal
Updated on
Summary

आतापर्यंत जरांगे यांनी सहावेळा बेमुदत उपोषण केले आहे. सध्या उपोषण सुरू असून त्यांची तब्येत खालावत चालली आहे.

सांगली : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढणाऱ्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या उपोषणाची दखल राज्य सरकारने तातडीने घ्यावी. सध्या त्यांचे उपोषण सुरू असून त्यांची तब्येत खालावली आहे. त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा राज्यभर उद्रेक होईल, असा इशारा मराठा समाज व संभाजी ब्रिगेडतर्फे (Sambhaji Brigade) देण्यात आला.

याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, गरजवंत मराठ्यांच्या ५० टक्क्यांच्या आतून ओबीसी प्रवर्गातून आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील गेली १३ महिने आंदोलन करत आहेत. आतापर्यंत त्यांनी सहावेळा बेमुदत उपोषण केले आहे. सध्या उपोषण सुरू असून त्यांची तब्येत खालावत चालली आहे. त्यांच्या आरोग्याचा विचार करता त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

Manoj Jarange Maratha Reservation
'प्रकाश आंबेडकर महायुतीत आले असते, तर आता ते एखाद्या खात्याचे मंत्री झाले असते'; शिवसेना-भाजप युतीबाबतही आठवलेंचा गौप्यस्फोट

आपण मराठा समाजाची परीक्षा न पाहता आपण स्वतः पुढाकार घेऊन मागण्या त्वरित मान्य कराव्यात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी सरकार म्हणून पुढाकार घ्यावा. विशेष अधिवेशन बोलवून मागण्या मान्य कराव्यात. विशेष अधिवेशन ‘लाईव्ह’ करावे, जेणेकरून विरोधी पक्षांची भूमिका अखंड मराठा समाजाला कळेल आणि मराठा आरक्षणाच्या विषयाचे कोण राजकारण करत आहे, हे महाराष्ट्राला समजेल. वरील विषय मार्गी लावले तर मराठा समाजाची नेहमी साथ राहील.

Manoj Jarange
Manoj Jarangeesakal
Manoj Jarange Maratha Reservation
मुस्लिमांबाबत उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांचं वादग्रस्त विधान; Supreme Court कडून स्वेच्छेने खटला दाखल, असं काय म्हटलं होतं?

वरील मागण्या विचारात घेऊन, आरक्षण देऊन हा प्रश्न कायमस्वरुपी निकालात काढावा, अन्यथा राष्ट्रीय महामार्ग रोको, रेल्वे रोको, सत्तेतल्या आणि विरोधी पक्षातील सरसकट नेत्यांना गावबंदी, नेत्यांना घेराव, शासकीय कार्यालयातील काम बंद आंदोलन, मराठा समाजातील मुले शाळा-कॉलेजवरती बहिष्कार टाकतील. मंत्रालयावर घंटानाद, पायी यात्रा काढण्यात येतील. आरक्षणाची दखल घेण्यात येत नाही, तोपर्यंत मंत्रालयाला घेराव आणि कामबंद आंदोलन केले जाईल, असे निवेदनात म्हटले आहे.

संभाजी ब्रिगेड अध्यक्ष युवराज शिंदे, बाळासाहेब पाटील, डॉ. संजय पाटील, देवजी साळुंखे, शिवाजी जाधव, अनिल सावंत, सुनील चव्हाण, तानाजी चव्हाण, प्रकाश पाटील, अशोक पाटील, रोहित पाटील, सतीश पाटील, प्रकाश पाटील, संजय पाटील, जालिंदर फारणे, विनायक शिंदे, शंकर शिंदे, बाजीराव पायमल, संभाजीराव जाधव आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.