Sharad Pawar : 'मराठा स्वराज्य'चा शरद पवारांना पाठिंबा; सांगली, सातारा, कोल्हापूरसह सात जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी घेतली भेट

'मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आम्हाला सध्या तरी त्यांच्याशिवाय आशेचा किरण दिसत नाही'
Ajit Pawar VS Sharad Pawar
Ajit Pawar VS Sharad PawarEsakal
Updated on
Summary

विकासासाठी सध्या तरी केंद्रात आणि राज्यात शरद पवार यांच्यासारखा अभ्यास व दूरदृष्टीचा नेता नाही.

सांगली : मराठा समाजाला आरक्षण, बेरोजगारी तसेच महागाईच्या प्रश्नावर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर आमची मोठी भीस्त आहे. या पार्श्वभूमीवर मराठा स्वराज्य संघाच्या सांगलीसह सात जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांनी पवार यांची बारामतीत भेट घेवून पाठीशी असल्याचे सांगितले.

मराठा स्वराज्यचे (Maratha Swarajya Sangh) सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, ठाणेसह सात जिल्ह्यातील १२० कार्यकर्ते बारामती येथे सोमवारी भेटीसाठी गेले. मराठा स्वराज्यचे महादेव साळुंखे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली.

Ajit Pawar VS Sharad Pawar
Ashok Chavan : भाजप नेते म्हणतात आम्ही भिडेंच्या मताशी सहमत नाही, मग कारवाई का करत नाही? अशोक चव्हाणांचा थेट सवाल

साळुंखे म्हणाले, विकासासाठी सध्या तरी केंद्रात आणि राज्यात शरद पवार यांच्यासारखा अभ्यास व दूरदृष्टीचा नेता नाही. केवळ शरद पवार यांच्यामुळे केंद्रात राज्याला मान मिळतो आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आम्हाला सध्या तरी त्यांच्याशिवाय आशेचा किरण दिसत नाही.

Ajit Pawar VS Sharad Pawar
Sulkud Water Scheme : इचलकरंजीला सुळकूडमधून पाणी दिल्यास उद्रेक होईल; हसन मुश्रीफांचा गर्भित इशारा

आम्ही त्यांच्याकडे राज्यातील ५० टक्के आरक्षणाचा कोटा वाढवून देण्यासाठी केंद्राकडे पाठपुराव्याची अपेक्षा व्यक्त केली आहे, असं त्यांनी सांगितलं. भेटलेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांत राज्य प्रवक्ते वसंत चव्हाण, संतोष पाटील, सुभाषराव गायकवाड, विजय वाघ, प्रथमेश चव्हाण, बबन पाटील, विजय जाधव, फत्तेसिंह राजमाने, राहुल चव्हाण, सागर चव्हाण आदींचा समावेश होता.

Ajit Pawar VS Sharad Pawar
Instagram वर छत्रपती शिवरायांबाबत आक्षेपार्ह पोस्ट; साताऱ्यात तणाव, हिंदुत्ववादी संघटनांकडून तोडफोड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.