...म्हणून मराठी चित्रपटसृष्टीला पडलीय 'या' भागाची भुरळ

...म्हणून मराठी चित्रपटसृष्टीला पडलीय 'या' भागाची भुरळ
Updated on

तळमावले (जि. सातारा) : परिसरातील मालदन गावात "प्रेमी' या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असून उमरकांचनमध्ये "टफ' या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरू होत आहे. त्यासाठी अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी नुकतीच उमरकांचनला भेट दिली. यावरून निसर्गरम्य वांग खोऱ्याची मराठी चित्रपटसृष्टीला भुरळ पडल्याचे दिसून येते. 

कोयना धरण, नेहरू गार्डन, घाटमाथा, वनकुसवडे, खळे, बनपुरी यासारख्या निसर्गरम्य परिसरात यापूर्वी मराठी-हिंदी चित्रपटांसह मालिकांचे चित्रीकरण झाले आहे. "काळूबाईच्या नावानं चांगभलं', "बळीराजाचे राज्य येऊ दे' अशा अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांचे चित्रीकरण याच विभागात झाले आहे. चित्रपट निर्माते अरुण कचरे यांनी या विभागाची चित्रपटसृष्टीला नव्याने ओळख करून दिली. यानिमित्त परिसरातील लोकांनाही रोजगार उपलब्ध होत आहेत. त्याशिवाय स्थानिक कलाकारांनाही व्यासपीठ मिळत आहे. या परिसरातील सागर कारंडे, संतोष साळुंखे यांच्यासारखे कलाकार भविष्यातही नावारूपाला येतील. काही दिवसांपासून ढेबेवाडी जवळील मालदनमध्ये "प्रेमी' चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होईल. उमरकांचनमध्येही "टफ' या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होणार आहे. त्यासाठी त्याच्या तयारी, पाहणीसाठी मकरंद अनासपुरे यांनी उमरकांचनला नुकतीच भेट दिली. या चित्रपटात नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे आदी नामवंत कलाकारांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. 

हेही वाचा  : कुऱ्हाडीने पत्नीचा खून करणाऱ्या पतीस शिक्षा

ढेबेवाडी : नवनवीन विषय घेऊन मोठ्या संख्येने चित्रपट येत आहेत, ही समाधानाची बाब असली, तरी त्यांना पुरेशी चित्रपटगृहे सुद्धा मिळायला पाहिजेत. मराठी चित्रसृष्टीला पुन्हा नव्याने भरभराट आणण्यासाठी चित्रपटगृहांची संख्याही वाढवायला पाहिजे. नाटकाचे प्रयोग नसलेल्या कालावधीत नाट्यगृहांचाही त्यासाठी वापर केल्यास हा प्रश्न बऱ्याच प्रमाणात सुटू शकतो, असे मत अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी दै "सकाळ'शी बोलताना व्यक्त केले.
 
मकरंद अनासपुरे दिग्दर्शित "काळोखाच्या पारंब्या' या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा मुहूर्त आज येथे झाला. इंद्रजित देशमुख यांच्या हस्ते झालेल्या कार्यक्रमास सरपंच विजय विगावे आदी उपस्थित होते. या वेळी श्री. अनासपुरे म्हणाले, ""राज्यात प्रदर्शित होणारे हिंदी- मराठी चित्रपट आणि उपलब्ध चित्रपटगृहे यांचे प्रमाण खूप विसंगत आहे. वर्षाचे 48 आठवडे धरले, तर दिडशे-दोनशे चित्रपट कसे आणि किती दिवस लावायचे? चित्रपटगृहांची संख्या वाढवा-वाढवा म्हणून अनेक दिवसांपासून मागणी सुरू असली तरी त्याकडे गांभीर्यानेही बघायला पाहिजे. यावर नाट्यगृहांचे रूपांतर चित्रपटगृहात करणे हा एक चांगला आणि सोयीस्कर पर्याय होऊ शकतो. नाट्यचळवळ तर टिकलीच पाहिजे. मात्र, नाट्य प्रयोगाव्यतिरिक्त अन्य वेळेत नाट्यगृहांचा चित्रपटगृह म्हणून वापर करणे सहज शक्‍य आहे, तो झाला पाहिजे. तसे झाले तर राज्यातील एकही नाट्यगृह कधीच रिकामे राहणार नाही. ग्रामीण भागातून अनेक नवोदित कलाकार समोर येत आहेत. या नव्या कलाकारांमध्ये एक नवी ऊर्जा बघायला मिळत आहे. खूप चांगले टॅलेंट त्यांच्यात आहेत. रंगभूमीवरील अनेक स्पर्धांमधूनही ते चमकत आहेत. त्यांना प्लॅटफॉर्म मिळवून देणे जुन्या मंडळींचे कामच आहे. माझ्यासारखे अनेक कलाकार ग्रामीण भागातूनच पुढे आलेले आहेत.'' 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()