निपाणीत 'नेसा' तर्फे मॅरेथॉन स्पर्धा; १६३० स्पर्धकांचा सहभाग

निपाणी एन्डयुरन्स स्पोर्ट्स असोसिएशन (नेसा) मार्फत निपाणीत प्रथमच भव्य खुल्या मॅरेथॉन स्पर्धा सर्व वयोगटासाठी (स्त्री/पुरुष) ५ किलोमीटर आणि १० किलोमीटरसाठी आयोजित केली होती.
Marathon
MarathonSakal
Updated on

निपाणी - मनुष्य आपल्या आयुष्यात कोणत्याही वयात कोणत्याही गोष्टीचा केव्हाही व कोठेही कसाही अस्वाद घेऊ शकतो. आपल्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण करून अनेक गरुड भराऱ्या घेऊ शकतो. पण हे सर्व करताना त्याचे आरोग्य जर त्याला साथ देत नसेल तर हे सर्व हवेत विरून जाते. हीच नाळ पकडून राष्ट्रीय स्तरावर ज्याप्रमाणे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले जाते. अगदी त्याच धर्तीवर रविवारी (ता.५) निपाणीत सर्व नागरिकांना याची देही याची डोळा प्रत्यय आल्याचे जाणवते. आपले सर्वांचे आरोग्य सदृढ असणे किती महत्त्वाचे असते त्याचा प्रत्यय आला.

निपाणी एन्डयुरन्स स्पोर्ट्स असोसिएशन (नेसा) मार्फत निपाणीत प्रथमच भव्य खुल्या मॅरेथॉन स्पर्धा सर्व वयोगटासाठी (स्त्री/पुरुष) ५ किलोमीटर आणि १० किलोमीटरसाठी आयोजित केली होती. सदरच्या स्पर्धेला सकाळी ६ वाजता मुन्सिपल हायस्कूल ग्राउंड येथून सुरूवात झाली. चंद्रकांत सपकाळे, राजू जडी, गुरुप्रसाद देसाई, केदार हिरेकुडी, अमरजित पाटील व मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूरातील आयर्न मॅन डॉ. संदेश बागडे, विनय कुलकर्णी उपस्थित होते.

Marathon
सावधान! करमाळ्यात बिबट्यासदृश प्राण्याचा वावर; वासरावर हल्ला

स्पर्धेमध्ये खासदार अण्णासाहेब जोल्ले, नगराध्यक्ष जयवंत भाटले यांच्यासह नगरसेवक आणि ४ ते ८० वयापर्यंतच्या नागरिकांनी सहभाग घेतला होता.

यशस्वीरित्या मॅरेथॉन पूर्ण करणाऱ्या सर्व स्पर्धकांना देवचंद महाविद्यालय आणि जी. आय बागेवाडीमधील एनसीसी कॅडेटच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविले. स्पर्धेत निपाणी शहर व परिसरातील तब्बल १६३० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. स्पर्धे दरम्यान स्पर्धकांना ऑन रूट हायड्रेशन सपोर्ट उपलब्ध होता. स्पर्धेपूर्वी वार्म अपसाठी झुंबा व रनिंग नंतर कूलडाऊन स्ट्रेचिंग एक्सरसाइजची सोय केली होती. या स्पर्धेला परिसरातील उत्कृष्ट प्रतिसाद मिळालेला असून यानंतरही अशा स्पर्धेचे आयोजन करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

यावेळी डॉ. संदीप चिखले, अतिश खोत, डॉ. शिवानंद दुमाले, महादेव कुलकर्णी, सनत जमदाडे, अर्जुन जनवाडे, प्रमोद निळेकर, देव टिंगरे, जयदीप गुरव, सचिन कुलकर्णी, शशी शाह, डॉ. सुहास पाटील, संजय हालभावी, साईराम अक्कोळे, तुषार माळी, विनोद साबळे, दीपक मेंडगुले, अमर संकपाळ, अश्विन पाटील, पवन ऋतूनावर, पंकज देशमाने, जयंत दुधाळकर, मिलिंद मेहता, स्वप्नील हरेल, सोमनाथ कोळी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.