पीडित महिला ही परगावची असून, मार्च महिन्यात फजल याने तिला शीतपेयातून गुंगीचे औषध दिले. त्यामुळे पीडित महिला चक्कर येऊन बेशुद्ध पडली.
सांगली : शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन विवाहितेवर बलात्कार केला. त्याचे व्हिडिओ चित्रण केले. तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत मार्च ते सप्टेंबरदरम्यान पीडित विवाहितेशी जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवण्यात आले. त्यानंतर तिला हुबळी येथे विकण्यासाठी घेऊन जात असताना पीडित महिलेने मिरज (Miraj) येथे संधी साधून कारचा दरवाजा उघडून पलायन करून आपली सुटका करून घेतली.