वीरपत्नीला मोबाईलपासून ठेवलेले दूर

Sandeep Sawant Wife Smita Sawant
Sandeep Sawant Wife Smita Sawant
Updated on

कऱ्हाड : जम्मू काश्‍मीरातील नौशेरा येथे घुसखोरांविरुद्ध आखलेल्या मोहिमेत दोन जवान हुतात्मा झाले. त्यात मुंढे (ता. कर्‍हाड, जि. सातारा) येथील संदीप सावंत यांना वीरमरण आले. कर्‍हाडमधील विजय दिवस चौकापासून सजवलेल्या टेंपोतून हुतात्मा संदीप यांची शोकयात्रा काढली गेली. या वेळी महाविद्यालयील युवक- युवतीसंह हजारो नागरिकांची उपस्थिती होती. 

ध्वनिक्षेपकावर लावण्यात आलेल्या देशभक्तिपर गीतांनी वातावरण गहिवरून गेले होते. कोल्हापूर नाका, गोटेमार्गे शोकयात्रा मुंढेत गेली. तेथून संदीप यांच्या घरासमोर पार्थिव ठेवण्यात आले. वीरपत्नी स्मिता, वीरमाता अनुसया, वडील रघुनाथ, भाऊ सागर यांच्यासह कुटुंबीयांना शवपेटीतून संदीपचे पार्थिव दाखवण्यात आले. ते पाहताच सर्वांनी हंबरडा फोडला. त्यांचा आक्रोश पाहून उपस्थितांची मने हेलावून गेली. या वेळी वीरपत्नी स्मिता व वीरमाता अनुसया यांच्या रडण्याने अनेकांना अश्रू अनावर झाले.

भाऊ सागर याने भडाग्नी दिला 

संदीप यांच्या घरामागे काही अंतरावर असणाऱ्या त्यांच्या जागेत अंत्यसंस्काराची सोय केली होती. घरापासून अंत्ययात्रा तेथे पोचताच उपस्थितांनी पुन्हा "हुतात्मा संदीप सावंत अमर रहे'चा जयघोष केला. या वेळी वीरपत्नी, वीरमाता यांच्यासह कुटुंबातील सदस्यांनीही अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर सैन्य व पोलिस दलाच्या पथकाने मानवंदना देत हवेत प्रत्येकी तीन फैरी झाडून सलामी दिली. त्यानंतर भाऊ सागर याने भडाग्नी दिला. दोन महिन्यांच्या तान्हुली रिया तेथेच होते. या वेळी "हुतात्मा संदीप सावंत अमर रहे'च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. 

हुतात्मा संदीप सावंत यांचे पार्थिव घरी आणण्यापूर्वी वीरमाता अनुसया यांची प्रकृती बिघडल्याने रुग्णवाहिकेसह डॉक्‍टरांनी तातडीने तेथे धाव घेतली. त्यानंतर पार्थिव घरी आल्यावर त्यांची प्रकृती पुन्हा बिघडल्याने डॉक्‍टरांना बोलावण्यात आले. त्यानंतर अंत्यसंस्काराच्या ठिकाणीही वीरमाता अनुसया यांना चक्कर आल्याने महिला डॉक्‍टरांनी त्यांच्यावर उपचार केले. 

 
वीरमाता, वीरपत्नीने फोडला हंबरडा 
हुतात्मा संदीप यांना वीरमरण आल्याचे संदीप यांचे वडील व भाऊ यांनाच माहीत होते. माहेरी आकाईवाडीत असलेल्या वीरपत्नी स्मिता व वीरमाता अनुसया यांना त्याची माहिती देण्यात आली नव्हती. दोघींनाही शुक्रवारी सकाळी त्याबाबत कल्पना दिल्याचे सांगण्यात आले. आकाईवाडी येथे असलेल्या वीरपत्नी स्मिता यांना संदीप यांच्या वीरमरणाची बातमी कळू नये, यासाठी तेथील केबल कनेक्‍शन तोडून टाकण्यात आले, तसेच त्यांचा मोबाईलही त्यांच्या भावाने घेऊन दोन दिवस त्यांना मोबाईलपासून दूर ठेवले. शुक्रवारी सकाळी आकाईवाडीत बाहेरगावाहून नातेवाईक आल्यावर त्यांना संदीप यांना वीरमरण आल्याचे सांगितले गेले. त्‍याच क्षणी त्यांनी हंबरडा फोडला. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()