सांगली-कोल्हापूरच्या महापूर प्रश्‍‍नात मेधा पाटकर घालणार लक्ष

येत्या शनिवारी सांगलीत कृती समितीची बैठक
सांगली-कोल्हापूरच्या महापूर प्रश्‍‍नात मेधा पाटकर घालणार लक्ष
Updated on

सांगली : सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर(medha patkar) यांनी कृष्णा नदीच्या (krishna river) महापूर प्रश्‍नात लक्ष घालण्याचे आश्‍वासन दिले आहे. येत्या शनिवारी (ता.२५) त्या सांगलीत येणार असून त्यांना कृष्णा महापूर नागरी कृती समितीच्यावतीने कृष्णा महापुराचा अंतिम अहवाल देण्यात येणार आहे. यावेळी त्यांची सांगली(sangli),कोल्हापूर(kolhapur) तसेच सातारा(satara) येथील तीन जिल्ह्यातील प्रतिनिधीसमवेत लढ्याची दिशा ठरवण्यासाठी बैठक होणार आहे. यावेळी महापूराची(flood) मदत न मिळालेल्या तक्रारीचीही समितीच्यावतीने दखल घेण्यात येणार आहे.

सांगली-कोल्हापूरच्या महापूर प्रश्‍‍नात मेधा पाटकर घालणार लक्ष
अकोला : जिल्ह्यातील ६१ मतदान केंद्रांवर मतदान शांततेत

समितीच्या सदस्यांनी कृष्णा तसेच वारणा,पंचगंगा या नद्यांचा प्रत्यक्ष दोन वर्षे सखोल अभ्यास करताना पूर रेषा, धरणातील पाणी साठा,नदी काठावरील बांधकाम अडथळे, काही पुलांचे अडथळे, कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यातील न काढलेले बरगे, पात्रातील पाण्याची क्षमता, पावसाच्या नोंदी, हवामान खात्याचा अभ्यास, होणारी ढग फुटी, आपत्ती व्यवस्थापनातील मदत,धरणातून होणारे परिचलन, नदी पत्रातील गाळ, वेगवेगळ्या भागात कमी जास्त पडणारा पाऊस, काठावरील अतिक्रमणे,नियमित न होणारे जलसंधारणाची कामे,हव्यासापोठी केलेले धरणातील पाणीसाठा, पाटबंधारे अधिकारी या सर्वांचा अभ्यास दौरा करून केलेला अहवाल तयार झाला आहे.

सांगली-कोल्हापूरच्या महापूर प्रश्‍‍नात मेधा पाटकर घालणार लक्ष
अकोला : ४८ ग्रामपंचायतींमधील ६१ पदांसाठी मंगळवारी मतदान

त्या अहवालाची राज्य शासन तसेच केंद्र सरकार यांनी दखल घ्यावी या साठी समाजिक कार्यकर्त्या पाटकर यांनी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन दिले आहे. याबाबत ग्रामपंचायत सदस्यांसोबत सोबत बैठका घेऊन तसे ठराव ग्रामपंचायतीनी केल्या आहेत. अजूनही काही ग्रामपंचायती सोबत बैठकी होणार आहेत. त्यात काही ग्रामपंचायतीनी केंद्राच्या धरण क्षमतेचे मार्गदर्शक तत्वाचे पालन न झाल्यास मायनर कर सुद्धा न भरण्याचा ठराव करण्यात आला आहे. नागरी सामितीने सुचवलेल्या सूचना तसेच उपाय योजना याचे पालन जर झाले नाही आंदोलानाच्या पर्यायाचा विचार करावा असे ठरले आहे. समिती सदस्य विजयकुमार दिवाण, डॉ.रवींद्र व्होरा, प्रमोद चौगुले, हणमंतराव पवार, प्रभाकर केंगार, प्रदीप वायचळ, सर्जेराव पाटील, सुकुमार पाटील, संजय कोरे, उदय गायकवाड (कोल्हापूर), कृष्णा महापूर नागरी कृती समितीचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()