''शक्तिपीठ महामार्गाला विरोध होत असल्याचे लक्षात आल्यावर राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या (Cabinet) बैठकीत महामार्गासाठी होणारे भूसंपादन थांबवण्याचा निर्णय घेतला.''
कोल्हापूर : नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गाचे (Nagpur to Goa Shaktipeeth Highway) भूसंपादन थांबवण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. त्यामुळे आता शक्तिपीठ महामार्गाचा विषय संपला आहे. यानंतर कोणाला आंदोलन करायचे असेल तर ते करू शकतात. आता जनतेने ठरवायचे की आपण किती मोर्चांमध्ये सहभागी व्हायचे. राज्य आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना बनवल्या आहेत. शेतकरी त्यांचा लाभ घेत आहेत. त्यामुळे विरोधकांना शेतकऱ्यांची खोट्या मुद्यांवर फसवणूक करता येणार नाही, असे स्पष्टीकरण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी येथे दिले.
पत्रकार परिषदेत ते म्हणाले, ‘‘शक्तिपीठ महामार्गाला विरोध होत असल्याचे लक्षात आल्यावर राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या (Cabinet) बैठकीत महामार्गासाठी होणारे भूसंपादन थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हा विषय आता संपला आहे. अजूनही काही जणांना आंदोलन सुरू ठेवायचे असल्यास ते सुरू ठेवू शकतात; पण नागरिकांनी किती मोर्चात सहभागी व्हायचे, हे ठरवले पाहिजे. शेतकऱ्यांना खोट्या मुद्यांवर भडकवून खोटा निमर्श (नॅरेटिव्ह बनवण्यात आला; मात्र तो एकदाच उपयोगी येतो.
केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. त्याचा लाभही शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मिळाला आहे. राज्यातील १४ जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. तेथील ग्रामपंचायतींना देवेंद्र फडणवीस यांनी विशेष निधी दिला आहे. ज्या शेतकऱ्याला कौटुंबिक आर्थिक अडचण येईल, त्याला या निधीतून त्या शेतकऱ्यांची नड पूर्ण होईल. त्यामुळे त्याच्या मनात आत्महत्येचा विचार येणार नाही. हा निधी खर्च करण्याचे अधिकारही ग्रामपंचायतीला देण्यात आले आहेत.’’
नीट परीक्षेतील घोटाळ्याबद्दल मंत्री पाटील म्हणाले, ‘‘नीट परीक्षेतील गैरप्रकार अतिशय गंभीर आहे. यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई होईल.’’ मुलींना उच्च शिक्षणातील शुल्क सवलतीबद्दल ते म्हणाले, ‘‘आचारसंहितेमुळे याचा शासन आदेश निघालेला नाही. आताही पदवीधर निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. त्यामुळे ही आचारसंहिता संपल्यावर हा आदेश निघेल.’’
मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे, असे शरद पवार म्हणतात; मात्र गेली ५० वर्षे शरद पवार सत्तेमध्ये होते. त्यावेळी त्यांनी मराठा समाजाला आरक्षण का दिले नाही? ते, समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करत आहेत. हे महाराष्ट्राच्या हिताचे नाही, अशी टीकाही चंद्रकांत पाटील यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.