कर्नाटक पोलिसांना महाराष्ट्राच्या मंत्र्याने दिला असा चकवा...

Minister of State Rajendra Patil Yadravkar traveling by ST reached Belgaum and stabbed the Karnataka police
Minister of State Rajendra Patil Yadravkar traveling by ST reached Belgaum and stabbed the Karnataka police
Updated on

कोल्हापूर - महाराष्ट्र एकीकरण समिती व विविध मराठी संघटनांकडून सिमा लढ्यातील हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी शुक्रवारी आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहण्यावर कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना मज्जाव केला. ठिकठिकाणी चेक वाहनांची तपासणी करण्यात येत असतानाच  राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी एस.टी.ने प्रवास करत बेळगाव गाठून कर्नाटक पोलिसांना चकवा दिला. सिमा भागातील मराठी बांधवांच्या पाठीशी महाराष्ट्र सरकार ठाम असल्याची ग्वाही मंत्री यड्रावकर यांनी दिली. 

कर्नाटक पोलिसांकडून होत होती वाहनांची तपासणी

कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्रातील मंत्र्यांसह लोकप्रतिनिधींना बेळगावच्या दिशेने जाण्यास मज्जाव केला. राज्यमंत्री यड्रावकर हे कार्यक्रमासाठी बेळगावला जात असताना मार्गावर कर्नाटक पोलिसांकडून वाहनांची तपासणी केली जात असल्याचे समजले. यावर त्यांनी कोगनोळी टोल नाक्‍यावर जाण्याआधीच आपल्या वाहनांचा ताफा थांबवत एस.टी.तून बेळगावच्या दिशेने कूच केली. सर्वसामान्य प्रवाशांप्रमाणे मंत्री यड्रावकर यांनी एस.टी.तून बेळगाव गाठले. त्यामुळे कर्नाटक पोलिसांना याची साधी चाहूलही लागली नाही.

मराठी बांधवांवर अन्यायाची भूमिका

 मंत्री यड्रावकर म्हणाले, 16 जानेवारी 1956 पासून सिमा भागातील मराठी बांधवांवर अन्यायाची भूमिका घेतली आहे. मराठी बांधवांवर सातत्याने कर्नाटक सरकार अन्याय करत असताना महाराष्ट्र सरकार बघ्याची भूमिका घेणार नाही. बेळगाव, कारवार, निपाणीसह परिसरातील मराठी बांधवांवर कर्नाटक सरकारने सापत्नभावाची वागणूक देऊ नये. महाराष्ट्र शासन नेहमी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असेल. गनिमी कावा करुन आपण मराठी बांधवांना आधार गेलो असल्याचेही त्यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.