अवैध धंदे बंद झाल्यास गुन्हेगारीला आळा बसू शकेल. गुन्हे का घडतात, याचीही उकल होणे गरजेचे आहे.
सांगली : जिल्ह्यात काही दिवसांपासून खुनांचे प्रमाण वाढले आहे. दरोडा, चोरी, घरफोडी यांसारखे गंभीर गुन्हेही घडत आहेत. जिल्ह्यात कायदा- सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, हे चिंताजनक आहे.
पोलिसांनी (Sangli Police) 'अॅक्शन मोड'वर येऊन गुन्हेगारांवर कायद्याचा वचक निर्माण करावा. नागरिक निर्भयपणे राहण्यासाठी कायदा- सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पावले उचला, अशा सूचना पालकमंत्री सुरेश खाडे (Suresh Khade) यांनी दिल्या. पालकमंत्री सुरेश खाडे यांनी काल जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला.
पोलिस मुख्यालयातील सभागृहात झालेल्या या बैठकीस पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव, पद्मा कदम, मंगेश चव्हाण, सुनील साळुंखे, पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, सतीश कदम उपस्थित होते. गेल्या काही दिवसांत शहरासह जिल्ह्यात खून, दरोड्याच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री खाडे यांनी आढावा बैठकीत चिंता व्यक्त करून पोलिसांना ॲक्शन मोड'वर येण्याची सूचना केली.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, गुन्हे प्रकटीकरण शाखा सक्षम करण्यात याव्यात, गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी व्यापक मोहीम हाती घ्यावी, गुन्हेगारांवर कायद्याचा वचक निर्माण झाला पाहिजे, यासाठी कोणताही मुलाहिजा न ठेवता कडक कारवाई करण्यात यावी. नशेखोरांवर कारवाई केल्यास गुन्हेगारीचे प्रमाण कमी होईल, असेही त्यांनी सांगितले.
अवैध धंदे बंद झाल्यास गुन्हेगारीला आळा बसू शकेल. गुन्हे का घडतात, याचीही उकल होणे गरजेचे आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन जनतेला असुरक्षितता वाटू नये, यासाठी पोलिस दलाने अधिक जागरूक राहणे आवश्यक आहे. प्रत्येक पोलिस ठाण्यात शांतता कमिटी स्थापन करण्यात यावी, अशा सूचनाही पालकमंत्री खाडे यांनी पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या.
पोलिस अधीक्षक डॉ. तेली यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात पालकमंत्र्यांना माहिती दिली. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबरोबरच व गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.