सांगली - बदलापूर येथील लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळलेली असतानाच, आज सांगलीतही अशीच घटना घडली आहे. शहरातील संजयनगर परिसरातील पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराने बलात्कार केल्याची घटना समोर आली. धक्कादायक बाब म्हणजे यातील आरोपी हा काही महिन्यांपुर्वी पॅरोलवर कारागृहातून बाहेर आहे. संजय प्रकाश माने (वय ३४) असे त्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी अवघ्या दोन तासात मानेला जेरबंद केले. काल रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.