Crime
CrimeEsakal

Miraj Crime: सराफाचे ३ लाखांचे सोने चोरीस

Maharashtra Crime: दोन सोनसाखळ्या चोरीस गेल्याचा समावेश आहे. त्यांचे वजन ५५.८६० ग्रॅम पोलिसांत नोंद झाले आहे.
Published on

Latest Marathi News: येथील मजती सराफी दुकानातून साडेपाच तोळे सोने चोरून नेल्याची फिर्याद पोलिसांत देण्यात आली आहे. पोलिसांनी याच दुकानातील सेल्समन असलेल्या दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ६ ऑगस्ट ते २४ ऑगस्टदरम्यान मिरजेतील दुकानातून हे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची फिर्याद देण्यात आली आहे.

समर्थ सुहास मजती (वय २३, मिरज) यांनी रूपाली राजेंद्र कोळी व ज्योती महेश जाधव (दोघी मिरज) या दोघींविरुद्ध पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांच्या दुकानातून सुमारे ३ लाख ३५ हजार १६० रुपये किमतीचे दागिने चोरीस गेल्याची फिर्याद त्यांनी दिली. त्यात दोन सोनसाखळ्या चोरीस गेल्याचा समावेश आहे. त्यांचे वजन ५५.८६० ग्रॅम पोलिसांत नोंद झाले आहे.

Crime
Pune Crime : हेक्सा ब्लेडने कुलूप कापून जबरदस्तीने फ्लॅटचा घेतला ताबा...जागा मालकासह एकावर गुन्हा दाखल...

मजती यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दुकानातील संबंधित दोन्ही सेल्समन यांनी नजर चुकवून दुकानातील सोन्याची चोरी केली. दागिन्यांची चोरी करून ते स्वतः वा नातेवाईक वा दुकानातील दुसऱ्या सेल्समनकडून कोणालातरी विकले गेले असावेत किंवा कुठेतरी लपवून ठेवले असावेत.

दुकानातील वेळोवेळी गैरहजेरीवरून तसे वाटते. दुकानातील किती दागिने चोरीला गेले हे पाहून तक्रार देत आहे. आणखी दागिने चोरीस गेले आहेत का ते पाहत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी या फिर्यादीवरून दोघी सेल्समन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Crime
Rahul Gandhi in Sangli: महाराष्ट्रात येऊन मोदींनी माफी का मागितली? राहुल गांधींनी सांगितली 3 कारणं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.