Miraj Station Bomb Threat Call : मिरज रेल्वेस्टेशन बॉम्बनं उडवण्याचा कॉल अन् पोलिसांची तत्परता....; पोलिसांचं यशस्वी मॉक ड्रिल

रात्री दहाची वेळ होती... विश्रामबाग अन मिरज पोलिस ठाण्यात फोन वाजला... 'रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देऊ', या धमकीच्या फोनने सारी यंत्रणा खडबडून जागी झाली.
Miraj Station mock drill
Miraj Station mock drillsakal
Updated on

सांगली - रात्री दहाची वेळ होती... विश्रामबाग अन मिरज पोलिस ठाण्यात फोन वाजला... 'रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देऊ', या धमकीच्या फोनने सारी यंत्रणा खडबडून जागी झाली. स्थानिक पोलिसांसह गुन्हे अन्वेषण विभाग, दहशतवाद विरोधी पथक, बॉम्ब शोधक पथक, राखीव दलाचे पोलिस, अग्निशमन यंत्रणा यांना वायरलेसवरून कॉल देण्यात आला.

अवघ्या काही मिनिटात सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. रेल्वे पोलीसही सोबतीला होतेच. तपासणी सुरू झाली. तेवढ्यात श्वान पथकही दाखल झाले. पोलिसांचा इतका मोठा फौजफाटा पाहून प्रवाशांमध्येही घबराट पसरली. या साऱ्यात यंत्रणा मात्र सतर्क आणि वेळेत घटनास्थळी दाखल झाली... याचा अभिमान साऱ्यांना वाटला आणि पोलिसांचं 'मॉकड्रील' यशस्वी झाले.

पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या नेतृत्वाखाली आज मॉक ड्रिल घेण्यात आले. अचानकपणे रात्री हा कॉल देत आपली यंत्रणा किती सतर्क आहे, याची तपासणी घेण्यात आली. वरिष्ठ अधिकारी वगळता सारेच याबाबत अनभिज्ञ होते. पण सांगली पोलिसांनी अत्यंत कर्तव्याला अधिक महत्व देत काही मिनिटात घटनास्थळी धाव घेतली. सुसज्ज असणाऱ्या पोलीस यंत्रणेची सतर्कता साऱ्या सांगलीकर आणि रेल्वे प्रवाशांनी पहिली.

या मॉक ड्रीलमध्ये पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधीक्षक रितू खोखर, उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, प्रणील गिल्डा, निरीक्षक सतीश शिंदे, ईश्वर ओमासे यांच्यासह फौजफाटा घटनास्थळी दाखवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.