Government Scheme : 'अन्नभाग्य'चे पैसे बँक खात्यात जमा होण्यास अखेर सुरुवात; नेमकी काय आहे सरकारची ही योजना?

अन्नभाग्य योजनेंतर्गत बीपीएल आणि अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना (BPL and Antyodaya Ration Card) मोफत तांदूळ देण्याची योजना सुरू केली आहे.
Anna Bhagya Yojana
Anna Bhagya Yojanaesakal
Updated on
Summary

आधीच गृहलक्ष्मी योजनेची दरमहा २ हजार रुपयेप्रमाणे गेल्या २ ते ३ महिन्याची रक्कम जमा होणे शिल्लक आहे.

बेळगाव : राज्य सरकारने (Karnataka Government) जाहीर केलेल्या विविध हमी योजनांची अंमलबजावणी गेल्या २ ते ३ महिन्यांपासून ठप्प झाली आहे. यामध्ये ‘अन्नभाग्य’ योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या रकमेचाही समावेश आहे. मेपासून (काहींची एप्रिल) अन्यभाग्य योजनेतील (Anna Bhagya Yojana) रक्कम येणे शिल्लक आहे. यातील एका महिन्यातील रक्कम बुधवार (ता. १९) पासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, अद्याप एक ते दोन महिन्याची शिल्लक रक्कम कधी जमा होणार, अशी विचारणा त्यांच्याकडून होत आहे.

राज्य सरकारकडून अन्नभाग्य योजनेंतर्गत बीपीएल आणि अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना (BPL and Antyodaya Ration Card) मोफत तांदूळ देण्याची योजना सुरू केली आहे. प्रति सदस्य १० किलो तांदूळ देण्याची योजना आहे. मात्र, केंद्राकडून तांदूळ पुरवठा होत नसल्याचे सांगून राज्य सरकार प्रति सदस्य ५ किलो तांदूळ पुरवठा करीत आहे. उर्वरित तांदळाची रक्कम प्रति किलो ३४ रुपयांप्रमाणे शिधापत्रिकाधारकांच्या बँक खात्यात (डीबीटीद्वारे) जमा करण्यात येत आहे. मात्र, एप्रिलपासून रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे अनेक शंका उपस्थित करण्यात येत होत्या.

आधीच गृहलक्ष्मी योजनेची दरमहा २ हजार रुपयेप्रमाणे गेल्या २ ते ३ महिन्याची रक्कम जमा होणे शिल्लक आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाआधी ३ मेपासून लाभार्थ्यांच्या खात्यात गृहलक्ष्मीची रक्कम जमा करण्यात आली होती. मात्र, बऱ्याच जणांना एप्रिलपासूनची रक्कम अद्याप जमा झाली नाही. यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर सरकारच्या हमी योजना बंद होणार का, अशी चर्चा सुरू आहे.

अन्नभाग्य योजनेतून लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना दरमहा उर्वरित तांदळाची रक्कम जमा करण्यात येत होती. मात्र, काहींना एप्रिलपासूनची रक्कम जमा झालेली नाही. यामुळे पुढील दिवसांत उर्वरित महिन्याची रक्कम जमा होणार का, याकडे त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()