Monsoon Update : शेतकऱ्यांनो, पेरणीसाठी घाई करू नका; कृषी विभागाची पेरणीबाबत महत्वाची अपडेट

खरीप हंगाम पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये.
Farmer
Farmeresakal
Updated on
Summary

'चांगला, दमदार पाऊस व पुरेशी ओल झाल्यानंतरच पेरणी करावी.'

घाटनांद्रे : कवठेमहांकाळ तालुक्याच्या खरीप हंगाम पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये. चांगला, दमदार पाऊस व पुरेशी ओल झाल्यानंतरच पेरणी करावी, बी-बियाणे, खते खरेदी करताना योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागामार्फत (Agriculture Department) करण्यात आले आहे.

दरम्यान, घाटमाथ्यावरील गावांसह तालुक्यात १३ हजार २५४ टन रासायनिक खतांची आवश्यकता आहे. त्यानुसार कृषी विभागाकडून खतांची मागणी करण्यात आली आहे. या हंगामात शेतकरी ज्वारी, बाजरी, मका या पिकांबरोबर तूर, मूग, उडीद, भुईमूग, सोयाबीन ही पिके घेतात.

Farmer
NCP नेत्याची गोळ्या झाडून हत्या; आरोपीनं कारागृहातून 22 कॉल करत हलवली खुनाची सूत्रं, चायना मोबाईलचा वापर

या पिकांच्या पेरणीसाठी (Kharif Season) बी-बियाणांबरोबर पिकांचे उत्पादन चांगले येण्यासाठी रासायनिक खतांची मात्रा देणे आवश्यक असते. त्यानुसार आवश्यक असणारी युरिया, डी. ए. पी., एम. ओ. पी., एस. एस. पी., एन. पी. के. या खतांची १३ हजार २५४ टन इतकी मागणी कृषी विभागाकडून करण्यात आली आहे.

Farmer
VIDEO : अंधश्रद्धेमुळं अनेक वर्षे बंद होता CM कार्यालयाचा दरवाजा, मुख्यमंत्र्यांनी 'ती' शंका दूर केली अन्..

अद्याप खरिपाच्या पेरण्या सुरू झाल्या नसल्या तरी पेरणी कालावधीत रासायनिक खते उपलब्ध असणे आवश्यक आहे. तालुक्यासाठी युरिया ३६४७ टन, डी.ए.पी. १४६२ टन, एम. ओ. पी. १४८२ टन, एस. एस. पी. २१२० टन आणि एन. पी. के. ४५४३ टन या रासायनिक खतांची मागणी करण्यात आली आहे. खरीप हंगामाच्या पेरण्या सुरू होताच ही रासायनिक खते कृषी सेवा केंद्रांतून उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

Farmer
मुख्यमंत्र्यांचा असाही संवेदनशीलपणा! जमिनीवर बसून वृद्ध दांपत्याची केली विचारपूस अन् दिला मदतीचा हात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.