Pre-monsoon Season : मॉन्सूनपूर्व पावसावेळी 'अशी' घ्या काळजी; वादळी वारा, विजांपासून असा करु शकता आपला बचाव

मे महिना सुरू झाला की मॉन्सूनपूर्व पावसाला (Pre-monsoon Rain) सुरुवात होते; याला वळीव पाऊस असेही म्हणतात.
Pre-monsoon Rain
Pre-monsoon Rainesakal
Updated on
Summary

अवकाळी पावसाबरोबर कोसळणारी वीज आणि ढगांच्या गडगडाटापासून दूर राहण्यासाठी प्रत्येकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे.

शिरगाव : मे महिना सुरू झाला की मॉन्सूनपूर्व पावसाला (Pre-monsoon Rain) सुरुवात होते; याला वळीव पाऊस असेही म्हणतात. जोराचा वादळी वारा, विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह येणाऱ्या पावसामुळे सर्वांचीच घाबरगुंडी उडून जाते.

विजांचा कडकडाटही पाहायला मिळतो अशावेळी निसर्गापुढे अतिशहाणा करून चालत नाही, अन्यथा मृत्यूशी गाठ पडते. अवकाळी पावसाबरोबर कोसळणारी वीज आणि ढगांच्या गडगडाटापासून दूर राहण्यासाठी प्रत्येकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे. भारत सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (National Disaster Management Authority) तसे नियमही घालून माहिती दिली आहे.

Pre-monsoon Rain
विजापूर-गुहागर महामार्गालगतची 'ही' विहीर बनलीये धोकादायक; अपघात होऊन सरळ दुचाकी गाड्या जाताहेत विहिरीत

अशी खबरदारी घेणे आवश्‍यक...

  • विजांचा कडकडाट सुरू असताना घराबाहेर पडू नका. घराबाहेर असाल तर सुरक्षित ठिकाणी थांबा.

  • उंच जागेवर जाणे टाळा.

  • विजा चमकत असताना झाडाखाली थांबू नका.

  • घरात असाल तर दारे-खिडक्या बंद करा.

  • गाडीत असल्यास काचा बंद ठेवा.

  • चार-पाच जण एकत्र असाल तर प्रत्येकामध्ये सुरक्षित अंतर ठेवा.

  • मोबाईल फोनचा वापर टाळा.

  • विजा चमकत असताना कुठल्याही ठिकाणी पोहणे धोकादायक असते.

  • एखाद्या व्यक्तीवर वीज कोसळली तर तातडीने प्रथमोपचारासाठी प्रयत्न करा.

  • वीज कोसळलेल्या व्यक्तीला स्पर्श केला तरी काही धोका नसतो.

  • वीज कोसळून संकटात सापडलेल्या व्यक्तीचा श्‍वासोच्छ्‌वास सुरळीत आहे का, हे सावधगिरीने तपासा.

  • त्या व्यक्तीचा श्‍वासोच्छ्‌वास बंद पडला असेल तर तोंडावर तोंड ठेवून कृत्रिम श्‍वासोच्छ्‌वास द्या.

  • अशावेळी घाबरून न जाता आपत्कालीन सेवा देणाऱ्या १०७८ या क्रमांकावर संपर्क साधून तुमच्यापर्यंत पोहोचता येईल याची अचूक माहिती द्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.