गेल्या दोन दिवसांपासून धरण क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कृष्णेसह सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे.
जयसिंगपूर : कर्नाटकातील हिप्परगी धरणाचे (Hippargi Dam) सर्व दरवाजे शनिवारी पहाटेनंतर उघडल्याने कृष्णा नदीची पाणीपातळी कमी होण्यास मदत होणार आहे. हिप्परगी धरण प्रशासनाने सर्व २६ दरवाजे खुले केल्याने कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील नदीकाठच्या गावांना दिलासा मिळाला आहे. आज (रविवार) दुपारपर्यंत कृष्णेची पाणी पातळी किमान तीन फुटाने कमी होण्याचा अंदाज आहे.
महाराष्ट्रातील व खास करून कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील महापुराला कर्नाटकातील हिप्परगी धरण कारणीभूत असल्याचे संदर्भ जोडण्यात आले आहेत. या हंगामात दोनवेळा नद्यांच्या पातळीत चढ-उतार झाला आहे. शुक्रवारी रात्रीपर्यंत आलमट्टी धरणात ९८.४१६ टीएमसी पाणी होते; तर ६५ हजारने विसर्ग सुरू होता. महाराष्ट्रातील शेवटचा बंधारा असणाऱ्या राजापूर बंधाऱ्यातून ५४ हजारने विसर्ग सुरू आहे. आलमट्टी आणि हिप्परगी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवावा, अशी मागणी होत होती.
एका बाजूला प्रशासन महापुरानंतरच्या उपाययोजना राबविण्यात व्यस्त असताना, केंद्रीय जल आयोगाच्या निकषाप्रमाणे धरणात पाणीसाठा असावा, अशी आग्रही मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे. किंबहुना प्रशासनाकडून कर्नाटकातील पाण्यावर नियंत्रण नसल्याने महापूर आल्यास याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असल्याच्या नोटिसाही आंदोलन अंकुशसह सामाजिक संघटनांनी कोल्हापूर आणि सांगली जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून धरण क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कृष्णेसह सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. गुरुवारी रात्रीपासून कृष्णा नदीच्या पाणीपातळीत तब्बल सात फुटाने वाढ झाल्याने नदीकाठच्या गावांमध्ये पुराची धास्ती वाढली होती. त्यामुळे हिप्परगी धरणातूनदेखील जादा पाण्याचा विसर्ग करण्याची मागणी होत होती. शनिवारी पहाटेनंतर हिप्परगी धरण प्रशासनाने सर्व दरवाजे उघडल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी विसर्ग सुरू झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.