दोघी मायलेकी तलाव पार करताना पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून गेल्या होत्या. घटना समजल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तसेच लोंढा पोलिसांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला.
खानापूर : जनावरे चरण्यासाठी घेऊन गेलेल्या माय-लेकींचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना दांडेली ग्रामीण येथे घडली. सखूबाई विठ्ठल येडगे (वय ४५) व गंगूबाई विठ्ठल येडगे (१७) अशी मृत्यू झालेल्या माय-लेकींची नावे आहेत. त्या खानापूर तालुक्यातील नागरगाळी पंचायत (Nagargali Panchayat) हद्दीत येणाऱ्या उमरापाणी गावच्या रहिवासी आहेत.