एकमेकांचे विरोधक खासदार जोल्ले-उत्तम पाटील लोकसभेच्या तोंडावर एकत्र; राजकीय चर्चांना उधाण, काय आहे कारण?

जोल्ले आणि पाटील यांनी इफ्कोसाठी एकत्रित निवडणूक लढविल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
MP Annasaheb Jolle and Uttam Patil Alliance
MP Annasaheb Jolle and Uttam Patil Allianceesakal
Updated on
Summary

पॅनेलमधील उमेदवारांना निवडून दिल्याबद्दल आणि निवडणुकीत सहकार्य केलेल्यांना जोल्ले व पाटील यांनी धन्यवाद दिले आहेत. शिवाय येत्या काळात सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

निपाणी : नवी दिल्ली येथील इफ्को संस्थेच्या (IFFCO Institute) हुबळी विभागासाठी झालेल्या निवडणुकीत खासदार अण्णासाहेब जोल्ले (Annasaheb Jolle) व सहकाररत्न उत्तम पाटील (बोरगाव) यांच्या नेतृत्वाखालील पॅनेल विजयी झाले. निपाणीत पक्षीय राजकारणात एकमेकांच्या विरोधात असणाऱ्या जोल्ले आणि पाटील यांनी इफ्कोसाठी एकत्रित निवडणूक लढविल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

इफ्को ही खत उत्पादनातील देशातील मोठी संस्था आहे. नवी दिल्ली येथे असलेल्या संस्थेच्या संचालक पदासाठी हुबळी विभागातून प्रतिनिधींची निवडणूक होते. हुबळी विभागाच्या (Hubli Division) निवडणुकीत उत्तर कन्नड, दावणगेरे, हावेरी, हुबळी, धारवाड, विजापूर, बागलकोट व बेळगाव या सहा जिल्ह्यांतून गुंतवणूक केलेल्या भागभांडवलदारांची संख्या मोठी आहे.

MP Annasaheb Jolle and Uttam Patil Alliance
आमचं काम पाहून विरोधकांच्या पोटात दुखतंय, त्यामुळं ते शिव्याशाप देताहेत; मुख्यमंत्री शिंदेंचा जोरदार निशाणा

हुबळी विभागातील संचालकांच्या निवडीसाठी झालेल्या निवडणुकीत खासदार जोल्ले व उत्तम पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेल विजयी झाले आहे. जोल्ले आणि पाटील (Uttam Patil) यांचे १६ उमेदवार निवडून आले आहेत. निवडणुकीत एकूण ६४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. निवड झालेल्या संचालकांमध्ये अण्णासाहेब दुर्ग्गन्नवर, अण्णासाहेब जोल्ले, उत्तम पाटील, अरुण देसाई, बाळासाहेब अरगे, मल्लाप्पा निंगज्जन्नवर, मुर्गेश माळगी, रामचंद्र हेगडे, रमेश भिवशे, रवींद्र हेगडे, सचिन केस्ते, संजय चौगुले, शिवलिंगप्पा पाटील, श्रीशैल पडेदार, सिध्दनगौडा पाटील, सुभाष चौगुला यांचा समावेश आहे.

MP Annasaheb Jolle and Uttam Patil Alliance
काँग्रेसला उमेदवारी डावलल्यास 2009 प्रमाणं 'जत पॅटर्न' राबवू; बड्या नेत्याचा स्पष्ट इशारा, नेमका काय आहे जत पॅटर्न?

पॅनेलमधील उमेदवारांना निवडून दिल्याबद्दल आणि निवडणुकीत सहकार्य केलेल्यांना जोल्ले व पाटील यांनी धन्यवाद दिले आहेत. शिवाय येत्या काळात सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी, राजकारण बाजूला ठेऊन निवडणूक झाली आहे. इफ्को संस्थेच्या योजनांचा लाभ शेतकरी व कृषी पत्तीन संघाच्या सभासदांना मिळणार असल्याचे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.