MPSC Result 2024 : प्रतिकूल परिस्थितीत शेतमजुराच्या कुटुंबातील राहुल बनला पीएसआय

शेतमजुराच्या कुटुंबातील मुलगा राहुल राजेंद्र काईत याची पोलीस उपनिरीक्षक पदी नुकतीच निवड झाली राहुल च्या या यशाने त्याचे शेतमजुरी करणारे कुटुंब उजळून निघाले
mpsc result 2024 rahul kait become police officer psi background of farmer family sangli
mpsc result 2024 rahul kait become police officer psi background of farmer family sanglisakal
Updated on

नवेखेड : येथील शेतमजुराच्या कुटुंबातील मुलगा राहुल राजेंद्र काईत याची पोलीस उपनिरीक्षक पदी नुकतीच निवड झाली राहुल च्या या यशाने त्याचे शेतमजुरी करणारे कुटुंब उजळून निघाले मुळचे बागणी वाळवा येथील हे कुटुंब चाळीस वर्षांपूर्वी कुटुंबावर बिकट परिस्थिती ओढवली त्यामुळे त्याचे आजी आजोबा वडील चुलते हे नवेखेड येथे राहण्यास आले.

या नवेखेड हे त्याच्या आजीचे माहेर इथे आल्यानंतर काईत कुटुंबाने मिळेल तो रोजगार करून आपली उपजीविका सुरू ठेवली हे करताना त्यात कोणतीही लाज बाळगली नाही आजी आजोबा वडील चुलते हे सर्वजण रोजदारी करत .हे करताना मजुरीच्या जीवावर त्यांनी नवेखेड गावात जागा घेऊन घर बांधले गुंठा जमीन नाही आजही ही कुटुंबाचा रोजगार सुरूच आहे.

संपुर्ण कुटुंबाचे कष्ट बघत राहुल ही लहानाचा मोठा झाला. त्याने ही काही दिवस कुटुंबाला मदत म्हणून एका दूध संस्थेत काम केले .त्याचे प्राथमिक शिक्षण नवेखेड च्या मराठी शाळेत तर माध्यमिक शिक्षण बोरगाव हायस्कुल मध्ये झाले इस्लामपूर च्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातुन बी एस सी ची पदवी मिळाल्यानंतर राहुल ने राजर्षी शाहू अकॅडमी मध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यास सुरुवात केली दोन वर्षांपूर्वी पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत मुलाखती मधून त्याला बाहेर पडावे लागले .

mpsc result 2024 rahul kait become police officer psi background of farmer family sangli
MPSC Result 2024 : निरगुडसर येथील भाजीपाला विक्रेत्यांचा मुलगा बनला पोलीस उपनिरीक्षक

थोडक्यात यश हुकले होते .त्यातच वडिलांचे निधन झाले त्याचे दुःख होते परन्तु ते बाजूला सारून .पुन्हा नेटाने अभ्यास करून या पदाला गवसणी घातली त्याच्या या वाटचालीत त्याच्या कुटुंबाने त्याला मोलाची साथ दिली.

आज राहुल च्या या यशाने त्याच्या कुटुंब आनंदात न्हाऊन निघाले.मानसिकता खंबीर असेल तर प्रतिकूल परिस्थिती मध्ये ही यश मिळविता येते हे त्याने सिद्ध करून तरुणाई समोर आदर्श उभा केला आहे आहे .कुटूंबाने आजवर घेतलेल्या कष्टाने राहुल च्या ही कष्टाचे चीज झाले कुटूंबाचा अनेक वर्षाचा काळोख राहुल च्या यशाने दूर झाला आहे.

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांनी हार्ड वर्क ची तयारी ठेवावी त्या बरोबर संयम बाळगायला हवा यश नक्की मिळते

- राहुल काईत नवेखेड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.