MSEDCL Action  47 agencies in the state which did not take accurate meter readings sangli
MSEDCL Action 47 agencies in the state which did not take accurate meter readings sangliSakal

राज्यात अचूक मीटर रीडिंग न घेणाऱ्या ४७ एजन्सीज बडतर्फ

‘महावितरण’ची कारवाई; चार महिन्यांत सुधारणा
Published on

सांगली : लघुदाब वर्गवारीतील ग्राहकांना वीजवापराप्रमाणे अचूक मीटर रीडिंगचे बिल देण्यासाठी ‘महावितरण’ने गेल्या फेब्रुवारीपासून विविध उपाययोजनांना सुरवात केली आहे. हेतुपुरस्सर चुका व अचूक रीडिंगमध्ये हयगय केल्याचे आढळून आलेल्या राज्यातील तब्बल ४७ मीटर रीडिंग एजन्सीजना बडतर्फ केले आहे; तर ८ एजन्सीजना काळ्या यादीत टाकले आहे. त्यामुळे रीडिंगच्या तक्रारींमध्ये मोठी घट; तर ‘महावितरण’च्या महसुलात वाढ झाली आहे.

‘महावितरण’ने वीजगळती कमी करण्यासोबतच बिलिंगसाठी वीज मीटरच्या अचूक रीडिंगला प्राधान्य दिलेय. ‘महावितरण’चे अध्यक्ष विजय सिंघल यांनी तक्रारीची गंभीर दखल घेतली. कोणत्याही परिस्थितीत प्रत्येक मीटरचे रीडिंग १०० टक्के अचूक झालेच पाहिजे. चुकीच्या वीजबिलांमुळे ग्राहकांना होणारा मनःस्ताप व बिल दुरुस्तीचा त्रास; तसेच ‘महावितरण’च्या महसुलाचे नुकसान अजिबात सहन केले जाणार नाही, इशारा दिला. शिवाय मीटरचे अचूक रीडिंग घेण्यात हयगय करणाऱ्या एजन्सीजविरुद्ध कारवाई केली.

एजन्सीजने काढलेल्या मीटर रीडिंगच्या फोटोची खातरजमा व पडताळणी करण्यासाठी मुख्यालयात यापूर्वीच स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाने केलेल्या पडताळणीमध्ये मीटर रीडिंगचे फोटो अस्पष्ट असणे, फोटो व प्रत्यक्ष रीडिंगमध्ये तफावत असणे; तसेच रीडिंग न घेता आल्याचा हेतुपुरस्सर शेरा देणे आदी प्रकार आढळून येत आहेत. त्याप्रमाणे संबंधित एजन्सीच्या कामामध्ये सुधारणा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु हयगय कायम राहिल्यास कारवाई करण्यात येत आहे. ग्राहकांना रीडिंगनुसार वीजवापराचे योग्य बिल मिळत असल्याने त्यांच्या तक्रारींचे प्रमाण कमी झाले आहे. सोबतच गेल्या एक महिन्यात वीजविक्रीमध्ये १९९ दशलक्ष युनिटने; म्हणजेच १४० कोटी रुपयांनी ‘महावितरण’च्या महसुलात वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.