सोलापूर : स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महामुद पटेल यांचे निधन

महामूद पटेल आणि पत्नी यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते
सोलापूर : स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महामुद पटेल यांचे निधन
Updated on

सोलापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महामुद इसाक पटेल (वय 58) रा. कुरघोट (ता. द. सोलापूर) यांचे रविवारी कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या पश्‍चात दोन मुली, दोन मुले, नातवंडे व वडील आहेत. महामूद पटेल आणि पत्नी यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वीच त्यांचे जावई इरफान पटेल (वय 44) व पत्नी लैलाबी महामुद पटेल (वय 54) यांचे निध झाले.

शेतकरी संघटनेच्या माध्यमातून विविध आंदोलनाचे त्यांनी नेतृत्व केले होते. शेतकऱ्यांसाठी लढणारा निष्ठावंत कार्यकर्ता अशी महामूद पटेल यांची ओळख होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांचे ते कट्टर समर्थक होते. शेतकऱ्यांच्या उसाला हमीभाव (एफआरपी) मिळवून देण्यासाठी माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानासमोर व सिद्धेश्वर साखर कारखान्यासमोर झालेले त्यांचे आंदोलन राज्यभर चर्चेचा विषय झाला होता.

सोलापूर : स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महामुद पटेल यांचे निधन
'खाकी'तली माणुसकी; बेशुद्ध फिरस्त्याचा वाचवला जीव

महामूद इसाक पटेल हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील कूरघोटचे रहिवासी होते. ते शरद जोशी प्रणीत संघटनेचे येथील शाखेचे अध्यक्ष होते. वेळोवेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या विविध समस्यांविषयी आंदोलने करून न्याय मिळवून दिला. त्यानंतर शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी महामुद पटेल यांच्यावर आली. ही जबाबदारी याआधी शिवानंद दरेकर यांच्यावर होती. शेतकऱ्यांचा थकीत एफआरपी, उजनी पाण्याचा प्रश्न, शेतमालाला हमीभाव यासह अनेक प्रश्नांसाठी त्यांनी आंदोलने केली आहेत. थकित उस बिल प्रकरणी तसेच शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची थकीत बिलांची रक्कम मिळवून देण्यासाठी त्यांनी भूमिका बजावली होती.

राजू शेट्टी यांनी वाहिली श्रद्धांजली

दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनीही सोशल मिडीयावरून श्रद्धांजली वाहिली आहे. फेसबुक पोस्टमध्ये ते लिहतात, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते आणि सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष महामुद पटेल यांचे निधन झाले. कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. शेवटी त्यांची कोरोनाशी झुंज अयशस्वी झाली. महामुद पटेल हे गेल्या चाळीस वर्षांपासून शेतकरी संघटनेमध्ये काम करत होते. मी ही मोठ्या विश्वासाने त्यांच्यावर सोलापूर जिल्ह्याध्यक्ष पदाची धुरा सोपवली होती. त्यांनी संघटनेची प्रभावी बांधणी करुन संघटनेचा दबदबा निर्माण केला. अशा लढाऊ कार्यकर्त्याच्या जाण्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेची फार मोठी हानी झाली आहे.

सोलापूर : स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महामुद पटेल यांचे निधन
Friends: The Reunion: च्या प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी, जाणून घ्या काय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()