Video : जेव्हा पाेलिस धावून येतात पालिकेच्या मदतीला

Video : जेव्हा पाेलिस धावून येतात पालिकेच्या मदतीला
Updated on

कऱ्हाड : शहरातील अतिक्रमणामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. त्यापार्श्वभुमीवर पालिकेने आज (बुधवारी) धाडसाने अतिक्रण हटाव मोहिम राबवली. आज सकाळी साडेआठच्या सुमारास येथील दत्त चौक, कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा परिसर ते विजय दिवस चौकापर्यंतची अतिक्रमणे पोलिस बंदोबस्तात काढण्यात आली.

कऱ्हाड शहरातील वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः बसस्थानक परिसरातील वाहतुकीचा मोठा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे दररोज वाहनधारकांना वाहतुक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामध्ये वाढलेले अतिक्रमण हाच कळीचा मुद्दा ठरला आहे. त्यावर हातोडा टाकण्यासाठी पालिकेने वेळीच पावले उचलणे गरजेचे होते. मात्र त्याला मुहुर्तच मिळत नव्हता. त्यासाठी स्वतः पोलिस उपाधिक्षक गुरव यांनी पालिकेला पत्र लिहून आम्ही केव्हाही बंदोबस्त देण्यात तयार आहोत, मात्र तुम्ही कार्यवाही करा, असे आवाहन केले होते. त्यानंतर पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनीही पालिकेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर एक बैठक घेवुन आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आवाहन केले होते. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत पालिका पदाधिकाऱ्यांनी वाहतुक अडथळा ठरणारी अतिक्रमण हटाव मोहिम राबवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्याला वेळ झाला असला तरी पालिकेमार्फत आज ही अतिक्रमण हटाव मोहिम राबवण्यात आली. येथील दत्त चौकातुन ही मोहिम आज सकाळी साडेआठच्या सुमारास राबवण्यास प्रारंभ करण्यात आला.

वाचा : रणरागिणी सरसावल्या; मतदानासाठी लागल्या रांगा

हेही वाचा : तहसीलदार कार्यालयातील लिपिक ५० हजाराच्या लाचप्रकरणी जाळ्यात

अवश्य वाचा : कार्यकर्त्यांसाठी करायला जावा अन् 

पालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे, नगरअभियंता ए. आर. पवार यांनी धाडसाने ही मोहिम राबवली. पोलिस उपाधिक्षक सुरज गुरव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.