Sangli Crime : विट्यात पत्नीच्या डोक्यात खोरे मारून खून; भाड्याच्या खोलीसाठी वाद, पतीला अटक

याप्रकरणी गुराप्पा यास ताब्यात घेऊन अटक केल्याचे पोलिस निरीक्षक शरद मेमाणे यांनी सांगितले.
Sangli Crime
Sangli Crimeesakal
Updated on
Summary

रागाच्या भरात संशयित गुराप्पा इकुरोट्टी याने घरातील खोऱ्याने पत्नी सलमाच्या डोक्यात वार केला. यामध्ये सलमा जागीच ठार झाली.

विटा : भाड्याने राहण्यासाठी कोठे जायचे? या कारणावरून झालेल्या वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात खोरे मारून खून (Murder Case) केल्याची घटना विटा (ता. खानापूर ) येथे बुधवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. सलमा गुराप्पा इकुरोट्टी (वय २८, खानापूर नाका विटा, ता. खानापूर) असे मृत पत्नीचे तर गुराप्पा शंकराप्पा इकुरोट्टी (वय ३०, मूळ याडहळ्ळी, ता. शोरपुरा, जि. यादगीर, कर्नाटक, सध्या विटा ता. खानापूर) असे संशयित आरोपी पतीचे नांव आहे.

याप्रकरणी गुराप्पा यास ताब्यात घेऊन अटक केल्याचे पोलिस निरीक्षक शरद मेमाणे यांनी सांगितले. याबाबत पोलिस महेश अरूण संकपाळ यांनी विटा पोलिसांत (Vita Police Station) फिर्याद दिली. पोलिसांनी सांगितले, की मूळचे कर्नाटक राज्यातील यादगिरी जिल्ह्यातील गुराप्पा व त्याची पत्नी सलमा विटा येथे खानापूर नाका येथील विजय उथळे यांच्या मालकीच्या खोलीत भाड्याने राहत होते. मोलमजुरी करून ते आपला उदरनिर्वाह करीत होते.

Sangli Crime
गर्भवती माता, बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात आढळला मृत साप; 'या' अंगणवाडीतील धक्कादायक प्रकार समोर

काही महिन्यांपासून त्यांच्यात वारंवार किरकोळ कारणावरून वाद होत होता. बुधवारी ३ जुलै रोजी रात्री आठ वाजल्यापासून त्यांच्यात भाड्याची खोली बदलून कोठे राहायला जायचे या कारणावरून वादावादी सुरू होती. याचदरम्यान रागाच्या भरात संशयित गुराप्पा इकुरोट्टी याने घरातील खोऱ्याने पत्नी सलमाच्या डोक्यात वार केला. यामध्ये सलमा जागीच ठार झाली. घटनेची माहिती समजताच रात्री उशिरा बघ्यांनी घटनास्थळी गर्दी केली होती.

Sangli Crime
शेतात खत घालायला गेलेल्या सख्ख्या भावांचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी अंत; पाटील कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक विपूल पाटील, पोलिस निरीक्षक शरद मेमाणे, पोलिस उपनिरीक्षक पुजा महाजन यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शविच्छेदनासाठी विटा ग्रामीण रुग्णालयात पाठविला. संशयित गुराप्पा इकुरोट्टी याला पोलिसांनी ताब्यात घेतले. मृत सलमाच्या मोबाईलमधील माहिती घेऊन सदर घटनेची माहिती तिच्या नातेवाईकांना कळविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com