खुनानंतर उसाच्या फडात निर्जन ठिकाणी त्यांचा मृतदेह आढळल्याने मारेकरी नजीकचा असण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
कुरळप : येथील इंदुमती राजाराम पाटील (वय ७०) या वृद्धेचा हात-पाय, तोंड कपड्याने बांधून व विळ्याने वार करून खून (Murder Case) करण्यात आला. मारुती राजाराम पाटील यांनी कुरळप पोलिसांत (Kurlap Police Station) याबाबत तक्रार दाखल केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, मारेकऱ्यांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मात्र, सायंकाळपर्यंत कोणाला ताब्यात घेतलेले नव्हते.