फिल्मी जगतातला संगीतमय जोतिबा

फिल्मी जगतातला संगीतमय जोतिबा
Updated on

बोरपाडळे - चित्रपटांच्या गीतांच्या शूटिंगसाठी दिग्दर्शकांना जितका पन्हाळ्याचा निसर्गरम्य परिसर आवडला तितकेच जोतिबावरील भक्तिमय वातावरण. त्यामुळेच अनेक नामवंतांनी गाण्यांसाठी जोतिबा परिसरही निवडला.

जोतिबाचा नवस चित्रपटातील ‘ही दुनिया हाय एक जत्रा अवस गवस नवस सतरा’ हे गीत सूर्यकांत, उषा नाईक यांच्यावर उतर दरवाजा म्हणजे सध्याचा सेंटर प्लाझा याठिकाणी यात्रा काळात चित्रित झाले. तसेच कुलस्वामीनी अंबाबाईमधील सुरेश वाडकरांच्या आवाजातील भालचंद्र कुलकर्णी यांच्या अभिनयाचं ‘चांगभलं र चांगभलं, देवा जोतिबा चांगभलं’ या गीताला अवघा महाराष्ट्र ओळखतो. अखंड महाराष्ट्राने डोक्‍यावर घेतलेल्या  ‘वारणेचा वाघ’ चित्रपटातील सूर्यकांतवर चित्रित ‘सतू धर्माचा भाऊ माझा; सतू डोंगरचा राजा’ हे गीत जोतिबावरील दक्षिण दरवाजा महंकाळी परिसरात साकारले. 

धूमधडाकामधील अशोक सराफ आणि सीमा यांच्यावर चित्रित ‘आग आग पोरी फसलीस ग’ हे वाघबीळजवळील बांबरवाडी डोंगरानजीक पूर्ण झाले. याशिवाय जोतिबाच्या मंदिराचा कळस दाखवत राजकपूरनी ‘आवारा हूं’ या शीर्षकगीताची धूनने चित्रपट सुरू केल्याचे येथील सिनेरसिक सुनील अमाने यांनी सांगितले.

‘चंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटामध्ये मोत्याचा घास तुला भरविते‘तुमचं आमचं जमलंमधील दादा कोंडके आणि जयश्री टी यांच्यावरील गीत ग्रामपंचायत कार्यालयजवळ झाले. ‘अकेलेही अकेले चला है कहा, हमसफर भी साथ लेले’ हे १९७३ सालच्या गोपी चित्रपटातील दिलीपकुमार आणि सायराबानू यांच्या युगुलगीताचे चित्रीकरण गायमुख परिसरात झाले.

चित्रतपस्वी भालजींसारख्या दिग्गज दिग्दर्शकांनी जोतिबा-पन्हाळ्याचा परिसर, इथले धुके, ढग आणि घाटाचा पुरेपूर वापर केला. याचा नवोदित दिग्दर्शकांनी लाभ घ्यावा. हा परिसर म्हणजे फिल्मी गाण्यांचे भांडार वाटते. संगीतमय परिसरात फिरताना एखादी धून ओठावर येतेच.  
- आनंदा सुतार,
हार्मोनियमवादक, 
रविवारपेठ पन्हाळा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.