मल्हारपेठ (जि.सातारा) : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने गावोगावी दहशतीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाकडून लोकांना घरी थांबण्याचे आवाहन केले असले, तरी त्याला वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहेत. मटण, चिकण विक्री बंद असतानाही काही व्यावसायिकांसह गावातच घरपोच देणाऱ्यांमुळे संचारबंदीचा फज्जा उडत आहे. कोरोनासंबंधी लोकांमध्ये गांभीर्य नसल्याचे जाणवते.
चिकन, मटणातून कोरोनाला आमंत्रण मिळत असल्याच्या सुरवातीला अफवा होत्या. त्यामुळे अनेकांनी चिकनकडे पाठ फिरवली. राज्यात पोल्ट्री व्यावसायिक धोक्यात आले. काहींनी तर कोंबड्यांना खाद्य देणे बंद केले. पोल्ट्री मालकांचे मोठे नुकसान झाले. संचारबंदीत मटण, चिकन, मासळी विक्रीलाही निर्बंध घातल्यामुळे व्यावसायिकांनी चोरून मटण, चिकनच्या पिशव्या चोखंदळ ग्राहकांस पुरवू लागले. त्यातही काही ठिकाणी विक्री करणाऱ्यांवर कारवाई झाली.
तरीही देशी कोंबडा, कोंबडीचा भाव चांगलाच वधारला. एरव्ही 400 ते 500 रुपयांना मिळणाऱ्या देशी कोंबड्याचा दर हजार रुपयापर्यंत गेला. अशा काळात हजार, बाराशे परवडत नसल्यामुळे नागरिकांचा मोर्चा पोल्ट्रीतील कोंबडीकडे वळला. गावातच चिकनच्या पिशव्या घरपोच मिळू लागल्या आहे. विक्रेता चिकनच्या पिशव्या तयार करून चोरून घरपोच देऊ लागल्याचे चित्र पाटण तालुक्यातील वाड्यावस्त्यांवर दिसत आहे. शिवारात झाडाखाली निर्जनस्थळी ओल्या रंगीत पार्ट्यांना उधाण आले आहे.
साहेब शेती शिवाय मजा नाय
संचारबंदी काळात ओल्या पार्ट्या करताना सापडल्यास त्यावर कारवाई अटळ आहे. संचारबंदी झुगारून लोक बाहेर पडत आहेत. पुणे, मुंबईहून आलेले काही लोक होम क्वॉरंटाइन असतानाही फिरताना दिसतात, ही बाब निंदनीय आहे.
डॉ. सुहेल शिकलगार, वैद्यकीय अधिकारी, मल्हारपेठ
पाेलिसांचे मनोधैर्य खच्चीकरण करण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही
सातारा शहरात चौघांवर गुन्हा दाखल
सातारा : दारात कोंबड्या कापून विक्री करत असल्याप्रकरणी चौघांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुजम्मी हमीद पालकर, सलमान गफुर पालकर, शाहीद हमीद पालकर व जुबेर जावेश शेख (सर्व रा. शनिवार पेठ) अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत हवालदार राहुल खाडे यांनी फिर्याद दिली आहे. गुरुवार परज येथील एका घरासमोर गर्दी जमली असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यांनी तेथे जाऊन पाहणी केली. त्या वेळी त्या घरासमोर चिकन विक्री सुरू असल्याचे समोर आले. त्यामुळे वरील चार संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.