पोलिसांनी लोक नोटा गोळा करीत आहेत याचे व्हायरल झालेले चित्रीकरण तपासून त्यातील व्यक्तींचा शोध घेऊन नोटा जप्त करण्याची कारवाई सुरू केली आहे.
आटपाडी : येथील ओढापात्रात पाण्यासोबत वाहून आलेल्या नोटा कोणाच्या? या प्रश्नाचे गूढ दुसऱ्या दिवशीही कायम राहिले. ते शोधण्यात पोलिसांना दुसऱ्या दिवसापर्यंत अजूनही यश आलेले नाही. दरम्यान, ज्यांनी नोटा गोळा केल्या होत्या. त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून नोटा ताब्यात घेण्याची कारवाई पोलिसांनी (Atpadi Police) सुरू केली आहे.