Operation Blue Star : ‘ऑपरेशन ब्लू स्टार’मुळे देश एकसंध; बिसूरच्या पतंगराव भगत यांनी चाळीस वर्षांपूर्वीच्या स्मृती जागवल्या

युद्ध केवळ सीमेवर लढले जात नाही, हा धडाच भारतीय सेनादलाने या मोहिमेद्वारे दिला.
nation united of Operation Blue Star Patangrao Bhagat evoked memories of 40 years
nation united of Operation Blue Star Patangrao Bhagat evoked memories of 40 yearsSakal

Sangli News : अमृतसर येथील जगप्रसिद्ध सुवर्ण मंदिरात खलिस्तानवादी दहशतवाद्यां-विरोधात ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ची कारवाई झाली. ३ ते ६ जून १९८४ दरम्यान झालेल्‍या कारवाईत सैनिक म्हणून सहभागी होते.

ही मोहीम म्हणजे अंतर्गत युद्धच होते. त्याला ४० वर्षे झाली. जीवावर उदार होऊन या मोहिमेत सहभागी झालेल्यांना सन्मान मिळाला...ना गौरव झाला. खरे तर देशांतर्गत शत्रूविरोधातील ते युद्धच होते. त्या मोहिमेने देशाची शकले रोखली.

या मोहिमेत सहभागी झालेले बिसूर (ता. मिरज) येथील निवृत्त हवालदार पतंगराव भगवान भगत यांनी ४० वर्षांनंतर ‘त्या’ स्मृती जागवल्या. युद्ध केवळ सीमेवर लढले जात नाही, हा धडाच भारतीय सेनादलाने या मोहिमेद्वारे दिला.

स्वतंत्र भारतात अशा अनेक मोहिमा भारतीय सैन्याने पार पाडल्या आहेत. त्यातही ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ मोहिमेचे महत्त्व वेगळे आहे. पंजाबमधील खलिस्तानवादी चळवळीला नेस्तनाबूत करण्यासाठी थेट पवित्र सुवर्ण मंदिरात सैन्य घुसवण्याचा धाडसी निर्णय घेणाऱ्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्याही या मोहिमेमुळेच पुढे झाली.

देशाचा इतिहासच या मोहिमेनंतर बदलला. मात्र या मोहिमेने भारताचा भूगोल सुरक्षित केला, हेही तितकेच खरे. खलिस्तानवाद्यांना गाडण्यासाठीच्या या युद्धात मुख्य मंदिरातील मोहिमेत सहभागी झालेले भगत आता ७२ वर्षांचे आहेत.

सैनिक वडिलांच्या प्रेरणेने सैन्यात भरती झालेले पतंगराव आता ७२ वर्षांचे आहेत. आजही ते ताठ कण्याने समाजात वावरतात. त्यांच्या पराक्रमाने गावची आणि महाराष्ट्राची मान उंचावली आहे.

भगत म्हणाले, ‘‘अतिरेक्यांनी पवित्र मंदिरातच शेकडो स्त्रियांना कोंडले होते. त्यांच्यावर अत्याचार सुरू केले होते. मोठा शस्त्रसाठा ठेवला होता. जागतिक ख्यातीचे हे सुवर्ण मंदिर दहशतवाद्यांचा अड्डा बनले होते. मंदिराच्या परिसरातच बंकरही बनवले होते. कारवाईवेळीही अनेक भाविकांना ओलीस ठेवले होते. त्या सर्वांची सुटका आम्ही केली.’’

‘‘आमचे अनेक सैनिक शहीद झाले. पुढे, या कारवाईची निंदा झाली. मोहीम वादग्रस्त ठरली. मात्र माझे मत आहे, की ती कारवाई आवश्‍यकच होती. ते झाले नसते तर आधी पंजाब वेगळा झाला असता आणि तेच अन्यत्रही झाले असते.

देशाची शकले झाली असती. या कारवाईत ८३ शहीद झाले. ४ अधिकारी, ४ कनिष्ठ अधिकारी व ७५ जवानांचा त्यात समावेश होता. सुमारे २०० जण जखमी झाले. अंदाजे पाचशेवर दहशतवादीही कारवाईत मारले गेले. अशा अनेकांच्या त्यागातून हा देश वाटचाल करीत आला आहे,’’ असेही ते म्हणाले.

‘राम...राम’चा जयघोष!’

पतंगराव भगत श्रीलंकेत ‘एलटीटीई’ विरोधातील मोहिमेतही सहभागी झाले होते. श्रीलंकेत त्यांनी शांतिसेनेतून नऊ - दहा महिने काढले. या काळातही जीवावर बेतणाऱ्या अनेक प्रसंगांना त्यांना सामोरे जावे लागले.

श्रीलंकेत शांतिसेना पाठवण्याचा तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचा निर्णयही योग्यच असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले. एक प्रसंग सांगताना ते म्हणाले,‘‘एकदा तर अतिरेकी आम्हाला समोरून इशारा देत निघाले होते. मात्र गोळीबाराचा आदेश मिळत नव्हता. कारवाई संपूर्ण जंगलात सुरू होती. प्रत्येक भारतीय सैनिकाच्या तोंडी ‘राम...राम’ चा जयघोष सुरू होता.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com