निपाणी : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पाणी; वाहतूक बंद

राष्ट्रीय महामार्गावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
निपाणी : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पाणी; वाहतूक बंद
Updated on

निपाणी : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर (pune-bangalore national highway) यमगर्णी-सौंदलगा (ता. निपाणी) दरम्यान मांगूर फाट्यानजीक वेदगंगा नदीचे पाणी गुरुवारी (२२) रात्री उशीरा आले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्गावर पोलिस (Police) बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. महामार्गावर पाणी आल्याने पुणे, सातारा, कराड, कोल्हापूरहून येणारी वाहने कोगनोळी चेकपोस्टवरुन व हुबळी, धारवाड, बेळगाव, निपाणीकडून (nipani) परत पाठविण्यात येत आहेत. वाहनधारकांनी या मार्गे न येता अन्य मार्गाने जाण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

राष्ट्रीय महामार्गावर दिवस-रात्र वाहनांची वर्दळ असते. सध्या कोरोना काळ असल्याने वाहतूक थोडी मंदावली आहेत. मात्र मालवाहतूक करणारी वाहने धावत असून त्यांची वाहतूक दोन महिन्यापासून पूर्वपदावर आली आहे. मात्र पावसाने जोर धरल्याने राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. त्यानुसार महामार्गावर पाणी आल्याने मालवाहतूक करणाऱ्या वाहनधारकांची अडचण झाली आहे. त्यांना कोगनोळी सीमा (kognoli check post) तपासणी नाका व निपाणीकडून परत पाठविण्यात येत आहे. परिणामी वाहनातील साहित्य पोहोचविण्यासाठी फे-याने प्रवास करावा लागणार आहे.

निपाणी : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पाणी; वाहतूक बंद
राधानगरीत झाडासह डोंगराचा भाग घरात घुसुन 3 महीला जखमी

सीमाभागातील नागरिक आरोग्याच्या कारणासाठी नेहमी कोल्हापूरशी संपर्कात असतात. सध्या कोविड काळ सुरू असल्याने भीतीचे वातावरण आहे. राष्ट्रीय महामार्गावर मांगूर फाट्यानजीक पाणी आले असल्याने कोल्हापूरला पोहोचणे कठीण होणार आहे. त्यामुळे रुग्णांना स्थानिक डॉक्टरांचा आधार घ्यावा लागणार आहे. कोगनोळी सीमा तपासणी नाक्यावरून कर्नाटकात प्रवेश घेताना आरटी-पीसीआर अथवा कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक केले होते. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक रोडावली होती. आता महामार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक पूर्णपणे थांबली आहे. निपाणी पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही बाजूला बंदोबस्त ठेवला आहे.

वाहने अन्य मार्गावर वळविण्यासाठी नियोजन

निपाणी, कित्तूर आणि हुक्केरीच्या मंडल पोलिस निरीक्षकांनी वाहने परत वळविण्यासाठी कोगनोळी, हिरेबागेवाडी व हत्तरगी टोल नाक्यावर पोलिस तैनात केले आहेत. तेथून तुमकुरू, चित्रदुर्ग, दावणगेरे, हवेरी, धारवाडसह उत्तर भारतातील राज्याकडे जाणारी वाहने अन्य मार्गावर वळविण्यात येत आहेत. होसपेट-विजापूर आणि हुबळी-विजापूर मार्गावरुन वाहने वळविण्याचे नियोजन केले आहे.

निपाणी : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पाणी; वाहतूक बंद
Chiplun Flood Update - NDRF ची 2 पथके चिपळूणात दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.