मांगले : मित्रांकडून उसनवार, कर्ज घेवून ‘अश्वमेध मोशन पिक्चर्स’ (ashwamedha motion picturs) संस्थेने ‘तेंडल्या’ चित्रपटाची (tendlya movie) निर्मिती केली. चित्रपटाला पाच राज्य आणि एक राष्ट्रीय पुरस्कार (national award win) मिळाले. मात्र या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक, कला दिग्दर्शकासह काही कालकार (actors, directors, writers) कोरोनाच्या आर्थिक संकटात सापडले आहेत. उसनवार रक्कम आणि कर्जाचे हफ्ते (loan) फेडण्यासाठी ते शिराळा तालुक्यात साडेपाच (shirala sangli) एकर पडीक शेती कराराने घेऊन राबत आहे. चित्रपटा निर्मितीला १ कोटी ७० लाखांचा खर्च आला होता. पोटासाठी आणि देणं फेडण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे.
२४ एप्रिल २०२० रोजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर (sachin tendulakar) यांच्या वाढदिवशी चित्रपट प्रदर्शित होणार होता. सर्व तयारी झाली होती. त्याचवेळी कोरोनाचे संकट जगावर पसरले. भारत आणि महाराष्ट्रातही (maharashtra) त्यांचे गंभीर परिणाम झाले. अजूनही स्थिती फार सुधारली नाही. उलट कोरोनाची दुसरी लाट गंभीर वळणावर आली आहे. त्यामुळे चित्रपटासाठी राबलेल्या साऱ्यांचे स्वप्नेच धुळीला मिळाली. पण टीम हारली नाही. संकटाचे मळभ दूर होताच आम्ही षटकार मारणार , असा दुर्दम्य आशावाद ती बाळगून आहे.
कोरोना संकटाचे वेगवेगळे अनुभव वर्षभर घेत आहोत. चित्रपट व्यवसायात उतरलेल्या वाळवा तालुक्यातील सामान्य कुटुंबातील आठ तरुणांनी शिराळा ते बिऊर फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील साडेपाच एकर शेती कराराने घेतली आहे. शेतात असणारी आंब्याची झाडे त्यांचे निवासस्थान आहे. स्वयंपाक करायचा. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत शेतात राबायचे, असा त्यांचा दिनक्रम आहे. चित्रपटासाठी घेतलेली कर्जावू रक्कम वेळेत परत करायची हा एकच ध्यास घेवून सारेजण काम करीत आहेत.
शेतात पीक घेतानाही झिरो बजेट आणि तत्काळ पैसे देणारा भाजीपाला त्यांनी निवडला आहे. घेतलेल्या साडेपाच एकरापैकी दीड- दोन एकर क्षेत्रच पेरण्यायोग्य होते. बाकी पडीक होते. डिसेंबरमध्ये शेत ताब्यात घेतले. सुरवातीला मेथी, कोथिंबीर एक एकर केली. आता गवार, भेंडी, पावटा, वांगी, टोमँटो अशी भाजीपिके घेतली आहेत. परिस्थितीवर मात कशी करायची याचे उदाहरण म्हणून सचिन तेंडूलकर यांचाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांची वाटचाल सुरू आहे.
तेंडूलकर, लेले आदर्श
सचिन तेंडूलकर आणि क्रीडा पत्रकार सुनंदन लेले हे या सर्वांचे आदर्श आहेत. ‘तेंडल्या’ चित्रपटाची निर्मिती सचिन जाधव आणि चैतन्य काळे यांनी केली आहे. साताराचे सुभाष जाधव कला दिग्दर्शक आहेत. हे तिघेही उच्चशिक्षित आहेत. महादेववाडीचे तानाजी केसरे प्रॉडक्शन मॅनेजर आहेत.
चित्रपटातील नाव ओळख
चित्रपटातील कलाकार ११ वी १२ वी पर्यंतचे शिक्षण सुरू असलेले आहेत. सर्वजण चित्रपटातील नावानेच ओळखले जाताहेत. ऐतवडे बुद्रुकच्या ओंकार गायकवाडला चित्रपटातील ‘पोप्या’, ठाणापुढेच्या स्वप्नील पाडळकरला ‘इंजान’, तांबवेच्या राज कोळीला ‘बारका आज्या’ महादेव वाडीच्या हर्षद केसरेला ‘जॉनट्यां’, देवर्डेच्या महेश जाधवला ‘जयसूर्या’ तर वाळव्याच्या आकाश तिकोटीला डीपी अशी नावे आहेत.
"शेतीत झिरो बजेट आणि तात्काळ पैसे देणाऱ्या भाजी पिकाची निवड केली आहे. संचारबंदीतही सर्वजण फिरून भाजी विकत आहोत. कोरोनाचे संकट किती काळ चालणार माहिती नाही. संकटानंतर चित्रपटगृहेही सुरू होणार आहेत. त्यावेळी मात्र आम्ही षटकार मारू. "
- सचिन जाधव, चित्रपट निर्माता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.