NCP Crisis : जयंत पाटलांचा कट्टर विरोधक अजितदादांच्या गळाला; 'या' नेत्याला मिळाली पक्षात येण्याची ऑफर!

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे रहात शरद पवारांच्या भूमिकेचे समर्थन केले.
Sharad Pawar Ajit Pawar Jayant Patil
Sharad Pawar Ajit Pawar Jayant Patilesakal
Updated on
Summary

राष्ट्रवादीमध्ये या पूर्वीही अजितदादा व जयंत पाटील यांच्यातील अंतर्गत संघर्ष वेळोवेळी दिसून आला आहे.

इस्लामपूर : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या समर्थकांसह राज्यातील शिंदे सरकारला पाठिंबा देत भाजपशी घरोबा केल्यानंतर प्रत्येक मतदारसंघात नवीन राजकीय समीकरणे उदयास येवू लागली आहेत.

इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात (Islampur Assembly Constituency) जयंत पाटील यांचे पारंपारिक विरोधक म्हणून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुल महाडिक यांना अजित पवार यांनी त्यांच्या गटात येण्याची ऑफर दिलीये.

Sharad Pawar Ajit Pawar Jayant Patil
Loksabha Election : कर्नाटकात मोठी उलथापालथ! लोकसभेची निवडणूक काँग्रेसला जड जाणार? BJP-JDS युतीच्या हालचाली

अजित पवार यांनी नूतन उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यावर दुसऱ्या दिवशी राहुल महाडिक यांनी त्यांची मुंबई येथे भेट घेवून चर्चा केली. त्यामुळे राहुल महाडिक राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्या गटात प्रवेश करणार? अशी चर्चा सुरु झाली आहे.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपला गट घेऊन भाजपशी जवळीक साधत राज्यातील सध्याच्या महायुती सरकारमध्ये सामील होणे पसंत केले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे रहात शरद पवारांच्या भूमिकेचे समर्थन केले.

Sharad Pawar Ajit Pawar Jayant Patil
Aditi Tatkare : 'या' जिल्ह्यासाठी NCP नेत्याला शिंदे गटाच्या आमदारांचा विरोध; आदिती तटकरे होणार रत्नागिरीच्या पालकमंत्री?

राष्ट्रवादीमध्ये या पूर्वीही अजितदादा व जयंत पाटील यांच्यातील अंतर्गत संघर्ष वेळोवेळी दिसून आला आहे. जयंत पाटील सुध्दा हेवीवेट नेते असल्याने अजित पवार यांना जयंत पाटील यांना शह देता आलेला नाही. सध्याच्या राजकीय परिस्थितीत अजित पवार आणि जयंतरावांमधील सख्य पाहत पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.

महाडिक यांनी पारंपरिक विरोधक जयंतरावांना शह देता येईल का, याची चाचपणी सुरु केली आहे. त्यांच्या या भेटीमुळे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात अजितदादा आपला गट बांधण्यास सुरुवात करतात हे आता पहावे लागेल. सध्या भाजपवासी असलेल्या महाडिक यांना अजितदादा गटात प्रवेशाची ऑफर असल्याची चर्चा आहे.

Sharad Pawar Ajit Pawar Jayant Patil
Deepak Kesarkar : B.Ed., D.Ed धारकांसाठी आनंदाची बातमी! शिक्षणमंत्री केसरकरांनी घेतला मोठा निर्णय

अजितदादांसोबत भेट झाली, त्यांनी भाजपप्रणीत आमच्या सरकारला पाठिंबा दिला आहे. या बरोबरच मला राष्ट्रवादी प्रवेशाचीही ऑफर दिली आहे. हे जरी खरे असले तरी मी अजूनही त्याबाबत विचार केलेला नाही.

-राहुल महाडिक

Sharad Pawar Ajit Pawar Jayant Patil
लोकसभेसाठी मास्टर प्लान; मंत्रीपदाचा राजीनामा देऊन 'हा' बडा नेता निवडणूक लढवणार? कन्येलाही मिळणार संधी!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.