विरोधकांना नामोहरम करण्यासाठी BJP कडून ED चा वापर

Jayant Patil
Jayant Patilesakal
Updated on

सांगली : ईडीचा (ED) वापर करून विरोधकांना नामोहरम करण्याची पद्धत गेली चार-पाच वर्ष सुरू आहे. भाजप (BJP) ईडीचा वापर करते हे आता लपून राहिलेले नाही, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP Jayant Patil) यांनी केला आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि मंत्री छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujbal) यांची मालमत्ता ईडीने जप्त केल्याबद्दल बोलताना प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी हे आरोप केले.

Summary

ईडीचा (ED) वापर करून विरोधकांना नामोहरम करण्याची पद्धत गेली चार-पाच वर्ष सुरू आहे.

सांगलीत पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, भाजप विरोधकांना नामोहरम करण्यासाठी ईडीचा वापर करत आहे, हे लपून राहिलेले नाही. गेली चार-पाच वर्षे ही पद्धत सुरू आहे. आमच्या नेत्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र चालू आहे, त्याची माहिती राज्यातील जनतेला आहे. ईडीचा वापर करणं, त्याच्या बातम्या मुद्दाम बाहेर देणं, प्रॉपर्टी जप्त करण्याच्या घोषणा करणं, ती कुणाची आहे हेही माहिती नसते. मात्र, घोषणा मोठ्या होतात.

Jayant Patil
निवडणुकीवर 'पैसा' खर्च करण्यापेक्षा निवडणुका 'बिनविरोध' करा

आमचे नेते बदनाम कसे होतील, अशा बातम्या पेरण्याचं काम चाललं आहे. मात्र, आमच्या नेत्यांना बदनाम करण्याचे हे षडयंत्र राज्यातील जनतेलाही माहिती आहे. त्यामुळे आमचे नेते एकनाथ खडसे, छगन भुजबळ यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न किती झाले, तरी त्यांना कोणतीही अडचण येणार नाही, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.