Sangli : एका बाजूला सत्तेची मस्ती असणारे लोक तर दुसऱ्या बाजूला..; NCP आमदाराची शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका

तुमच्या कामाची प्रगल्भता अध्यक्ष शरद पवार यांनी ओळखली आहे. तेव्हा भविष्यात चांगली संधी नक्की मिळेल.
Shashikant Shinde
Shashikant Shindeesakal
Updated on
Summary

आपली माणसं सत्तेत असली की किती फायदा होतो, हे अरुण लाड यांच्याकडे पाहिल्यावर लक्षात होते. शरद लाड यांना भविष्य चांगले आहे.

कुंडल : सध्याच्या सरकारचा गैरकारभार व त्यांना निवडणुकीत पराभवाची भीती वाटत असल्याने लांबवीत गेल्या आहेत, अशी टीका आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी येथे केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पलूस, कडेगाव तालुका बूथ कमिटी आढावा बैठक बलवडी फाट्यावरील कार्यालयात झाली, त्या वेळी ते बोलत होते.

Shashikant Shinde
पर्यटकांसाठी महत्वाची बातमी! 'हा' किल्ला 16 ऑक्टोबरपर्यंत राहणार बंद; नियम मोडल्यास होणार कठोर कारवाई

आमदार अरुण लाड, अध्यक्ष अविनाश पाटील, कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, सरचिटणीस बाळासाहेब पाटील, महिलाध्यक्षा सुश्मिता जाधव, गटनेते शरद लाड, पूजा लाड प्रमुख उपस्थित होते. आमदार शिंदे म्हणाले, एका बाजूला सत्तेची मस्ती असणारे लोक आहेत आणि दुसऱ्या बाजूला जनतेची क्रांती आहे. या दोघांचीच लढाई भविष्यात लोकशाहीसाठी लढावी लागणार आहे.

त्यासाठी सर्वजण सज्ज राहा. सर्व निवडणुकांच्या विजयाचा बूथ कमिट्या हा एकच यशस्वी राजमार्ग असल्याने त्या सक्षम करा. निवडणुकीपुरती बूथ कमिटी नसावी, संबंधित विभागातील सामाजिक कार्यात ही सक्रिय काम करा. महिलांमध्ये विलक्षण ताकद असल्याने बूथ कमिटीत सहभाग अधिक असावा. आगामी काळात लढणाऱ्या कार्यकर्त्यांना नेहमी संधी मिळेल, असंही शिंदे म्हणाले.

Shashikant Shinde
चिंताजनक! 'या' प्रमुख धरणांतील पाणी पातळी खालावतेय; पाऊस लांबल्यास भीषण टंचाईची भीती

आपली माणसं सत्तेत असली की किती फायदा होतो, हे अरुण लाड यांच्याकडे पाहिल्यावर लक्षात होते. शरद लाड यांना भविष्य चांगले आहे. त्यांच्याकडे नेतृत्वकौशल्य चांगले आहे. या भागात आघाडी होईल की नाही, माहिती नाही. मात्र कामात राहा, कामात राहिलं की संधी नक्की मिळते. तुमच्या कामाची प्रगल्भता अध्यक्ष शरद पवार यांनी ओळखली आहे. तेव्हा भविष्यात चांगली संधी नक्की मिळेल, असंही शिंदेंनी स्पष्ट केलं.

Shashikant Shinde
Kolhapur : तुळजाभवानी मंदिर परिसरात दारू पिऊन दगडावर पडल्याने भिक्षुक ठार; खुनाचा संशय बळावला

आमदार अरुण लाड म्हणाले, न रडत न बसता लढत राहणं, हेच आम्ही शिकलो. तेव्हा आपण कामात राहू या. कोणतीही तक्रार न करता पक्षासाठी झटूया. प्रत्येक बूथ कमिटीने सक्षमणे काम केल्याने या परिसरात पक्ष वाढत आहे. मतदारांनी आपल्याकडे येण्यापेक्षा आपणच त्यांच्यापर्यंत पोहोचू. यातून सामान्यांची लहानात लहान कामेही मार्गी लावूया.

Shashikant Shinde
Flood News : यंदाही सातारा, सांगली जिल्ह्यांना महापुराचा फटका बसणार; कोट्यवधींचं होणार नुकसान?

यावेळी सुशांत देवकर, विश्वास पाटील, मेघा पाटील, पलूस तालुकाध्यक्ष मोहन पाटील, नंदा पाटील, डी. एस. देशमुख, वैशाली मोहिते, जयदीप यादव, सुरेश शिंगटे, महेंद्र करांडे, सतीश पाटील, जगदीश महाडिक, नितीन नवले, अरुणा जाधव, मृणाल पाटील, ज्ञानेश पाटील यांच्यासह पलूस, कडेगाव तालुक्यातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. इंद्रजित पवार यांनी स्वागत केले. जिल्हा परिषद गटनेते शरद लाड यांनी प्रास्ताविक केले. संतोष जाधव यांनी सूत्रसंचालन केले. सुरेश शिंगटे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.