Sangli News : राष्ट्रवादी काँग्रेसने इस्लामपूरच्या विकासाची काळजी करू नये - विक्रम पाटील

अमृत २ मधून दिलेला इस्लामपूरच्या १२३ कोटी रुपये तांत्रिक मंजुरीचा २४ बाय सात पाणी योजनेचा प्रस्ताव आम्ही शंभर टक्के पूर्ण करू
Vikram Patil
Vikram Patilsakal
Updated on

इस्लामपूर (जिल्हा सांगली) : अमृत २ मधून दिलेला इस्लामपूरच्या १२३ कोटी रुपये तांत्रिक मंजुरीचा २४ बाय सात पाणी योजनेचा प्रस्ताव आम्ही शंभर टक्के पूर्ण करू. राष्ट्रवादी काँग्रेसने त्याची काळजी करू नये. त्यांना विकासावर बोलण्याचा अधिकार नाही. महाविकास आघाडी सरकारने मी आणलेल्या रकमेला स्थगिती दिल्याने ती रक्कम येऊ शकली नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसने शहराच्या विकासाची काळजी करू नये, असे आव्हान विकास आघाडीचे अध्यक्ष व पालिकेतील पक्षप्रतोद विक्रम पाटील यांनी आज राष्ट्रवादीला प्रत्त्युत्तरादाखल दिले. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विजय कुंभार, मनसेचे सनी खराडे, मोहसीन पटवेकर उपस्थित होते.

विक्रम पाटील म्हणाले, "अमृत २ योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या प्रस्तावामुळे राष्ट्रवादीला पोटशूळ उठलेला आहे. अनेक वर्षे सत्ता असतानाही राष्ट्रवादीला २४ बाय ७ योजना मंजूर करून पूर्ण करता आली नाही.

Vikram Patil
Sangli : एका बाजूला सत्तेची मस्ती असणारे लोक तर दुसऱ्या बाजूला..; NCP आमदाराची शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका

उपनगरातील लोकांना त्यांच्या सत्ताकाळात सुविधा मिळाल्या असत्या तर हे शहर नावारूपाला आले असते. एखाद्या योजनेतील नियमांच्या अटीचे पालन होते तेव्हाच त्याला तांत्रिक मान्यता मिळते, हे राष्ट्रवादीने समजून घ्यावे. हे सरकार भाजपच्या विचारधारेतून राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना पिण्याचे पाणी देण्यासाठी कटिबद्ध आहे. '

केंद्र सरकारने त्यासाठी हजारो कोटींची तरतूद केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने या योजनेची चिंता करू नये. भाजपचे कार्यकर्ते एखादे आश्वासन देतात, ते पूर्णही करून दाखवतात. अमृत योजना पूर्ण झाली नाही तर मी राजकारण सोडून देईन; मात्र झाली तर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी राजकारण सोडून द्यावे.

Vikram Patil
Sangli Crime : उसन्या पैशांचे कारण ठरले जीवघेणे; भाजीविक्रेत्याला भोसकले

सत्तेच्या माध्यमातून जनतेची पिळवणूक करणे, जनतेवर अन्याय करणे हे काँग्रेस-राष्ट्रवादीचे धोरण होते. आरक्षणाच्या माध्यमातून शेकडो कुटुंबे त्यांनी उध्वस्त केली. शहराच्या विकासाला खीळ घातली. भविष्यात पाणी योजना पूर्ण झाल्यावर पश्चिम महाराष्ट्रातील इस्लामपूर हे महत्त्वाचे शहर म्हणून नावारूपाला आणू.

आमची सत्ता असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांच्या प्रभागात किमान साडेसात कोटींची कामे आम्ही केली आहेत. विकासावर बोलण्याचा अधिकार राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना नाही. सभागृहात यांच्यात कसलाही ताळमेळ नव्हता. त्यांनी सातत्याने विकासाला विरोध केला. भाजी मार्केटसारख्या मोठ्या योजनेला विरोध केला.

Vikram Patil
Sangli : हिंदू-मुस्लिम द्वेषभावना भडकवणारे भाषण! विक्रम पावसकर यांच्यावर इस्लामपुरात गुन्हा!

अनेक रस्ते होऊ दिले नाहीत. ३०० एचपीच्या मोटारीचा ठराव त्यांच्या कारकिर्दीतच झाला होता. आमची सत्ता आल्यावर पाणीपुरवठा सभापती म्हणून राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील तीन वर्षे पाणीपुरवठा सभापती होते. मग त्यांनी का ही मोटर आणली नाही? मुख्याधिकारी ऐकत नाहीत असे यांचे म्हणणे असेल तर त्यांना लाडाने इस्लामपुरात कोणी आणले? एखादा अधिकारी ऐकत नसेल तर त्याला प्रत्त्युत्तर देण्याचा दम यांच्यात नाही."

चौकट : २० नगरसेवक आमचे असतील!

राष्ट्रवादीची अवस्था सैरभैर झाली आहे. काय बोलावे हे कुणालाच कळत नाही. आमच्या सत्ताकाळात यांना आवाज उठवता आला नाही. यांना शहरातील जनता कंटाळली आहे. सत्तेच्या माध्यमातून त्यांचा कसलाही उपद्रव नागरिकांना नकोय. येत्या निवडणुकीत आमचे किमान २० नगरसेवक आम्ही निवडून आणू,असेही विक्रम पाटील यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.