Video Jayant Patil : "जयंत पाटलांचा विरोध तुम्ही बघितलेला नाही, टोकाला जायला...", विशाल पाटील अन् कदमांना इशारा, काय आहे प्रकरण?

Video Jayant Patil : लोकसभेवरून महाविकास आघाडीमध्ये सांगलीत वाद निर्माण झाला होता. त्यांचे पडसाद अद्याप देखील उमटताना दिसत आहेत.
Video Jayant Patil
Video Jayant Patil Esakal
Updated on

लोकसभेवरून महाविकास आघाडीमध्ये सांगलीत वाद निर्माण झाला होता. त्यांचे पडसाद अद्याप देखील उमटताना दिसत आहेत. काँग्रेसने दावा केला तरीदेखील ही जागा शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला आली. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी बंडखोरी करत विजयही मिळवला. त्यानंतर देखील या वादाचे पडसाद उमटताना दिसत आहेत. लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणूक काही महिन्यावर आली आहे. सांगली लोकसभा काँग्रेसला मिळू नये यासाठी राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी सुत्र हलवल्याचा आक्षेप घेतला आहे. त्यानंतर पुन्हा एकदा महायुतीत धुसफुस सुरू असल्याचे चित्र आहे.

अशातच खासदार विशाल पाटील आणि विश्वजीत कदम यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन अप्रत्यक्षपणे आव्हान दिलं. त्यानंतर जयंत पाटील यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसून आलं आहेत. समर्थकांनी रिल्समधून विशाल पाटील आणि विश्वजीत कदम यांना इशारा दिला आहे.

रिलमध्ये काय आहे?

जयंत पाटील यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल केला आहे. त्यात जयंत पाटील यांचा आवाज आणि काही व्हिडीओ क्लिप्स लावण्यात आल्या आहेत. त्यामध्ये जयंत पाटील म्हणतात, "जयंत पाटील गोड बोलतात, पण जयंत पाटलांचा विरोध तुम्ही अजून बघितलेला नाही. मला त्या टोकाला जायला लावू नका. आहे ते सगळंच गमवाल एवढंच सांगतो."

Video Jayant Patil
Rohit Pawar: "अधिवेशन होऊ दे...फंड मिळू दे…आम्ही विचार करु", कोणाला पक्षात घ्यायचं याबद्दल रोहित पवार स्पष्टच बोलले

‘करेक्ट कर्यक्रमा’चे नियोजन लावू,’’ आमदार विश्वजित कदमांचा इशारा

‘‘लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने एकीचे प्रदर्शन करत विशाल पाटील यांना निवडून आणले. यामध्ये मिरज पश्चिम भागातील आठ गावांनी मोठे योगदान दिले. मतदारसंघांमध्ये ही गावे नसतानाही येथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी मतदारसंघात सतत राबता ठेवला. वसंतदादा आणि पतंगराव कदम यांच्या विचारांशी नाळ असलेल्या या आठ गावांवर आमचे विशेष लक्ष असेल. शिवाय, इस्लामपूर मतदारसंघातही आम्ही आता लक्ष घालून ‘करेक्ट कर्यक्रमा’चे नियोजन लावू,’’ असा इशारा माजी मंत्री, आमदार विश्वजित कदम यांनी दिला.

Video Jayant Patil
Assembly Elections: मविआचा फॉर्म्युला ठरला?, कुणाला मिळणार किती जागा, जागावाटपाबाबत निकष काय?

‘दबावाखाली राहण्याचे दिवस संपले’ - विशाल पाटील

विशाल पाटील म्हणाले, ‘‘आम्ही दादा कुटुंबीय सर्व मतभेद विसरून एकत्र आलो आणि सांगलीची चर्चा देशाभर झाली. विश्वजित कदम, जयश्री पाटील यांनी जबाबदारी घेत मोट बांधली. अशीच मोट आम्ही यापुढील काळामध्ये इस्लामपूर मतदारसंघांमध्येही बांधणार आहोत. दबावाखाली राहण्याचे दिवस आता संपले आहेत. त्यामुळे जसा समोरचा वागेल, त्याच भाषेमध्ये त्यांना उत्तर दिले जाईल.’’

Video Jayant Patil
Pune Draught: पुणे जिल्ह्यात पारंपारिक दुष्काळ! शरद पवारांचं मुख्यंमत्र्यांना पत्र; म्हणाले, कायमचा...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.