सातारा : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून शासनाने पालिका व नगरपंचायतीच्या हद्दीतील शाळा व महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता आजपासून (मंगळवार) ग्रामीण भागाचाही त्यात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आजपासून सातारा जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयेही बंद राहणार आहेत.
याबराेबरच सातारा पालिकेने शहरातील मॉल, चित्रपटगृहे व चौपाटी अशी सार्वजनिक ठिकाणे 31 मार्चपर्यत बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन कक्ष तयार करण्यात आला असून, त्यामध्ये दोघांची तीन शिफ्टमध्ये नेमणूक करण्यात आली आहे.
नगराध्यक्षा माधवी कदम व उपाध्यक्ष किशोर शिंदे यांनी याबाबतची माहिती पत्रकाद्वारे जाहीर केली आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केलेल्या आवाहनानुसार पालिकेने याबाबतची तातडीने पावले उचलली आहेत. गर्दी टाळण्यासाठी शहरातील चित्रपटगृहे, चौपाटी, मॉल बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शहरात 22 कर्मचाऱ्यांचे जलद प्रतिसाद पथक तयार करण्यात आले असून, त्यांच्या नियंत्रणासाठी एक अधिकारी व दहा कर्मचाऱ्यांची समिती काम करणार आहे. संशयित रुग्णांची माहिती मिळविण्यासाठी दीडशे कर्मचारी शहरातल्या 20 प्रभागाला भेटी देणार आहेत. त्यामध्ये प्रत्येक कुटुंबाचा सर्व्हे करण्यात येणार आहे. विशेषतः परदेशातून आलेल्या व्यक्तींची विशेष माहिती गोळा केली जाणार आहे. प्रत्येक वॉर्डात जंतुनाशक पावडर व धूर फवारणी मोहीम तातडीने सुरू करण्यात येणार आहे. त्याबाबत आरोग्य सभापती अनिता घोरपडे यांनी आरोग्य निरीक्षकांना सूचना दिल्या आहेत. शहरामध्ये आठ ठिकाणी कोरोना विषाणूची माहिती आणि प्रतिबंध करणारे फलक उभे करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर घंटागाड्यांच्या स्पीकरवरूनही कोरोनाबाबतची माहिती दिली जात आहे. कोणत्याही माहितीसाठी नागरिकांनी 234076 किंवा 234077 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कदम व शिंदे यांनी केले आहे. दरम्यान, पालिकेच्या जुन्या प्रवेशद्वारावर अधिकारी व पदाधिकारी यांनी सकाळी हात धुण्याचे प्रात्यक्षिक केले. मुख्याधिकारी शंकर गोरे, उपमुख्याधिकारी संचित धुमाळ, नियोजन सभापती ज्ञानेश्वर फरांदे, पाणीपुरवठा सभापती यदुनाथ नारकर, नगरसेविका आशा पंडित, कर्मचारी या वेळी उपस्थित होते.
काळजी घेण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन
पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन कोरोनाबाबत घेतलेली दक्षता व उपाययोजनांची माहिती दिली. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने विविध निर्बंध घातले आहेत. त्याला नागरिकांनी सहकार्य करावे, तसेच कोरोनापासून बचावाबाबत काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले. कोरोना संशयित रुग्णालयातून पळून गेल्याच्या घटना काही ठिकाणी घडल्या आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील या वॉर्डच्या बाहेर पोलिस बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना प्रशासनाला केल्याचे त्यांनी सांगितले.
शाळा, महाविद्यालयांना सुट्या परंतु...
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठीची उपाययोजना म्हणून शासनाने पालिका व नगरपंचायतीच्या हद्दीतील शाळा व महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आत ग्रामीण भागाचाही त्यात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आजपासून (मंगळवार) जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयेही बंद राहणार आहेत.
दरम्यान साताराचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या स्वाक्षरीने साेमवारी रात्री काढण्यात आलेल्या आदेशात शाळा आणि महाविद्यालय सुटीबाबत मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना सूचना करण्यात आल्या आहेत.
दुरस्ती आदेशात जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, महाविद्यालये, तंत्रशिक्षण विभाग, आैद्याेगिक प्रशिक्षण संस्था, काेचिंग क्लासेस व अकादमी ३१ मार्च २०२० पर्यंत बंद करण्यात येत आहे.
तथापि जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे मुख्यालयाचे ठिकाणी नियमित उपस्थित राहील याची दक्षता शिक्षण विभागाने घ्यावयाची आहे असे नमूद केले. नव्याने काढण्यात आलेल्या दुरुस्ती आदेशानूसार केवळ विद्यार्थी वर्गास सुटी राहणार आहे.
सातारा सातारा सातारा
Coronavirus Coronavirus Coronavirus
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.