'सांगलीचा पुढचा खासदार मी किंवा चंद्रहार पाटील यापैकीच असेल'; काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

आमदार विश्‍वजित कदम (Vishwajeet Kadam) यांच्यासह डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनीही तुफान फटकेबाजी केली.
Sangli LokSabha Constituency
Sangli LokSabha Constituencyesakal
Updated on
Summary

सांगली लोकसभेला विशाल पाटील विरुद्ध चंद्रहार पाटील अशा लढतीचे संकेत दिले.

सांगली : सांगलीचा पुढचा खासदार मी किंवा चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यापैकीच असेल, असा विश्‍वास व्यक्त करत काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील (Vishal Patil) यांनी जोरदार राजकीय टोलेबाजी केली. कडेगाव तालुक्यातील येतगाव येथे कुस्ती मैदानात (Wrestling Competition) ते बोलत होते.

आमदार विश्‍वजित कदम (Vishwajeet Kadam) यांच्यासह डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनीही तुफान फटकेबाजी केली. डॉ. कदम यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस कार्यकर्ते अर्जुन कणसे यांनी मैदान आयोजित केले होते. डॉ. कदम यांच्या उजवीकडे चंद्रहार, तर डावीकडे विशाल पाटील होते.

Sangli LokSabha Constituency
राष्ट्रवादी सोडून गेलेल्यांना शरद पवार निवडणुकीत हिसका दाखवणार; रोहिणी खडसेंचा अजितदादा गटावर निशाणा

डॉ. जितेश कदम यांनी ‘बाळासाहेबांच्या दोन्ही बाजूला दोन पैलवान बसलेत,’ असे सांगत राजकीय बत्ती पेटवून दिली. चंद्रहार यांनी ‘बाळासाहेब, मला पतंगराव कदमसाहेबांनी नेहमी प्रेम दिलं. मी महाराष्ट्र केसरी व्हावं, यासाठी पाठबळ दिलं. तुमच्या पाठबळाच्या जोरावर जिल्ह्याचा केसरी होऊ द्या’, असे सांगत ‘अप्रत्यक्षपणे लोकसभेसाठी पाठीवर हात ठेवून लढ म्हणा,’ अशी गळ घातली. त्यांच्या या विधानावर टाळ्यांचा कडकडाट झाला.

Sangli LokSabha Constituency
Hasan Mushrif : बिद्री गेली आणि आता जिल्हाध्यक्षपदही गेलं..; मुश्रीफांनी 'या' नेत्याचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

विशाल पाटील यांनी कडी करत अप्रत्यक्षपणे खासदार संजय पाटील यांना टोला लगावला. ‘पुढचा खासदार या व्यासपीठावरचा होईल,’ असे सांगत सांगली लोकसभेला विशाल पाटील विरुद्ध चंद्रहार पाटील अशा लढतीचे संकेत दिले. विश्‍वजित कदम यांचा ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख करत विशाल यांनी येथे काही वर्षांत मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त कुस्ती मैदान भरेल. बाळासाहेबांनी उजवीकडं पाहिलं किंवा डावीकडं पाहिलं तरी आम्ही त्यांना आता जिल्ह्याचं आणि राज्याचं नेतं मानलं आहे,’ अशी ग्वाही दिली.

Sangli LokSabha Constituency
Maratha Reservation : सरकार मराठ्यांचंच आहे, त्यामुळं मराठा समाजानं सहकार्याची भूमिका घ्यावी - मुख्यमंत्री शिंदे

विश्‍वजित कदम यांनी ‘‘मी गाडी चालवताना जो नियम पाळतात, तो काटेकोर पाळणार आहे. ना डावीकडे पाहायचं, ना उजवीकडं. सरळ समोर बघून गाडी चालवायची. तुमच्या डाव्या-उजव्यात आमच्या गाडीचा ॲक्सिडेंट व्हायला नको.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.