निपाणी (चिक्कोडी) : जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक अत्यंत चुरशीने झाली. त्यामुळे या निवडणुकीत कोणाचे वर्चस्व होणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. बोरगाव नगर पंचायतीत (Borgaon Nagar Panchayat) युवानेते उत्तम पाटील (Uttam Patil)गटाने १७ पैकी १६ जागा पटकावत आपले निर्विवाद वर्चस्व कायम राखले. येथे भाजपला (BJP) एकही जागा मिळाली नसून अण्णासाहेब हवले गटाला एक जागा मिळाली. एकसंबा नगरपंचायतीच्या निवडणुकीत (Eksambha Nagar Panchayat Election) काँग्रेसचे माजी खासदार प्रकाश हुक्केरी (Prakash Hukkire)व आमदार गणेश हुक्केरी (Ganesh Hukkire) विरूद्ध भाजपच्या मंत्री शशिकला जोल्ले आणि खासदार अण्णासाहेब जोल्ले (Shashikala Jolley, MP Annasaheb Jolley) यांच्यात चुरस होती. येथे काँग्रेसने १७ पैकी १६ जागा पटकावत विजय संपादन केला. या ठिकाणी भाजपला केवळ एकच जागा मिळाली. जिल्ह्यातील अन्य नगर पंचायत व नगर परिषदांच्या निवडणुकीत भाजप व काँग्रेसला 'कहीं खुशी, कही गम' चा प्रत्येय आला. त्यामुळे काही ठिकाणी भाजप तर काही ठिकाणी काॅग्रेसला धक्का बसला.
अथणीत काँग्रेसचे वर्चस्व
अथणी नगरपालिकेत २७ जागांसाठी निवडणूक झाली. त्यात काँग्रेसला १५, भाजपला ९ तर अपक्ष ३ उमेदवारांनी विजय मिळविला. येथे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी व आमदार लक्ष्मण सवदी हे भाजपचे नेते असताना काॅग्रेसने वर्चस्व राखले.
उगार खुर्द, एेनापूरला काँग्रेस तर शेडबाळमध्ये भाजप विजयी
उगार खुर्द : कागवाड (Kagwad) तालुक्यातील उगार खुर्द, ऐनापूरला काँग्रेस तर शेडबाळमध्ये भाजपने विजय संपादन केला.उगार खुर्द नगर परिषदेत २३ जागांसाठी निवडणूक झाली. त्यात काँग्रेसने ११, भाजपने ७ तर अपक्ष उमेदवारांनी ५ जागा पटकावल्या. एेनापूरमध्ये १९ जागांसाठी निवडणूक लागली होती. त्यात १३ जागांवर काँग्रेसस तर ६ जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले.शेडबाळ नगर पंचायतीसाठी १६ जागा होत्या. त्यात भाजपने १२, काँग्रेसने २ तर धजद आणि अपक्षाने प्रत्येकी १ जागा पटकावली.
हारुगेरी, मुगळखोड, कंकणवाडीत भाजप तर चिंचलीत काँग्रेसचे वर्चस्व
रायबाग : रायबाग तालुक्यातील हारुगेरी, मुगळखोड, कंकणवाडी पालिकेवर भाजप तर चिंचलीत काँग्रेसने वर्चस्व मिळविले.हारुगेरी नगरपरिषदेत 23 जागासाठी निवडणूक लागली होती. त्यात भाजपने 15, काँग्रेसने 7 व अपक्ष 1 उमेदवाराने विजय मिळविला. मुगळखोड नगरपरिषदेत 23 जागा होत्या. त्यातील 1 जागा बिनविरोध झाल्याने 22 जागांसाठी निवडणूक लागली होती. निवडणुकीत एकूण जागापैकी भाजपने 13, काँग्रेसने 4 तर अपक्ष 6 उमेदवारांनी विजय मिळविला. चिंचली नगरपंचायतीत 19 जागासाठी निवडणूक झाली. त्यात काँग्रेसने 9, भाजपने 5 व अपक्षांनी 5 जागा मिळविण्यात यश मिळविले. कंकणवाडी नगरपंचायतीत 17 जागा होत्या. त्यात भाजपने 12 तर काँग्रेसने 5 जागा मिळविल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.