निपाणीत: गादी कारखान्याला भीषण आग

निपाणी भीषण आगीमुळे कारखान्याच्या इमारतीवर धुराचे लोट बाहेर दिसत होते.
भीषण आग
भीषण आगsakal
Updated on

निपाणी: येथील जुना पीबी रोडवरील पदमा गादी कारखान्याला गुरुवारी (ता. १०) दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली. घटनेत कारखान्यातील साहित्याचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. जिवीत हानी मात्र झालेली नाही. शाॅर्टसर्कीटमुळे आग लागली असण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

भीषण आग
Hinganghat Burning Case : दोषी विकेशला मरेपर्यंत जन्मठेप

जुन्या पीबी रोडवर सदानंद पाटील यांचा पद्मा गादी कारखाना व दुकान आहे. आज (ता. १०) आठवडी बाजार असल्याने येथील कर्मचारी बाहेर कामात व्यस्त होते. अचानक दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास कारखान्याच्या पाठीमागील बाजुने धुराचे लोट येऊ लागले. शिवाय कारखान्याच्या छपरावरून धूराचे लोट बाहेर येताना आढळले. दुकान मालक व कर्मचारयांनी कारखान्यात जाऊन पाहिले तर आग लागली होती. बघताबघता आगीने रौद्र रुप धारण केले.

भीषण आग
Hinganghat Case: न्याय मिळाला पण अर्धवटच; पीडितेच्या आईची प्रतिक्रिया

घटनास्थळी साखरवाडीसह आजुबाजुच्या दुकानातील व्यावसायिक आणि जाणारे-येणारे लोक थांबून पाणी मारण्यासाठी मदत करू लागले. त्वरीत येथील अग्निशामक दलातील पाण्याचे बंब पाचारण करण्यात आले. अग्निशामक बंब दाखल झाल्यावर आग विझविण्यासाठी निकराचे प्रयत्न सुरु झाले. मात्र आग आटोक्यात येत नव्हती. अखेर चिक्कोडी, सदलगा, संकेश्वर, हमिदवाडा येथील अग्निशामक बंब पाचारण करण्यात आले. जवळपास दोन तासानंतर आग नियंत्रणात आली.

घटनेत कारखान्यातील कापूस, गादी, ऊशा, बेडसीट, ऊशी कव्हर, चटई यासह साहित्य आणि कारखान्यातील फर्निचर, कपाटे, छत जळून खाक झाले. जमलेल्या लोकांनी कारखान्यातील साहित्य व माल बाहेर काढण्यासाठी मदत केली. घटनास्थळी तहसीलदार डाॅ. मोहन भस्मे, जिल्हा अग्निशामक अधिकारी शशिधर निलगार, नगराध्यक्ष जयवंत भाटले यांनी भेट देऊन पाहणी केली. सायंकाळी उशीरापर्यंत नुकसानीचा अंदाज प्रशासनाकडून घेतला जात होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.