पूरग्रस्तांनो घरी परतण्याची घाई करू नका

Sangli Flood Study In Japan Sangli Marathi News
Sangli Flood Study In Japan Sangli Marathi News
Updated on

सांगली : हवामान खात्याने या आठवड्यात कोयना धरण (Koyna Dam) क्षेत्र व परिसरात अतिवृष्टीचा अंदाज वर्तवल्याने कृष्णा नदीची (Krushna River) पाणी पातळी पुन्हा ४० ते ४२ फुटांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. यामुळे या भागातून स्थलांतरीत झालेल्या नागरिकांनी प्रशासनामार्फत सूचना दिल्याशिवाय पुन्हा घरी परतू नये, असे आवाहन महापालिका आयुक्त नितीन कापडणीस (Nitin Kapdnis) यांनी केले आहे. (nitin-kapadnis-Appeal-Flood-victims-not-return-home-sangli-flood-news-akb84)

कृष्णा नदीला गेल्याच आठवड्यात महापूर आला होता. यामुळे नदीकाठचा परिसर बाजारपेठा, निम्मे सांगली शहर पुराने बाधीत झाले होते. यावेळी कृष्णा नदीची महापुराची पाणी पातळी ५६ फुटांपर्यंत गेली होती.महापूर सोमवारपासून ओसरू लागला. आज दुपारपर्यंत आयर्विन पुलाजवळ पाणी पातळी ३९ फूट होती. कृष्णा नदी पात्रात गेल्याने पूरग्रस्त घरी परतू लागले आहेत. त्यांनी पुराने बाधीत झालेलं घर स्वच्छ करण्यास सुरुवात केली होती.

Sangli Flood Study In Japan Sangli Marathi News
'मोबाईलवरील एक फोटो म्हणजे पंचनामा नव्हे'

दरम्यान, हवामान विभागाने कोयना धरण क्षेत्रात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे कोयना धरणातून आजपासून ४९,३०० क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. त्यामुळे पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. सुमारे 40 ते 42 फुटांपर्यंत पाणी पातळी वाढणार आहे. सध्याच्या पाणीपातळीत आणखी तीन ते चार फूट पाणी वाढू शकते. कृष्णा नदीची पातळी चाळीस फूट इतकी आहे. सध्या पाणी पातळीपेक्षाही खाली गेले आहे.

कोयना धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे उद्यापर्यंत पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या पाणी ओसरत असल्यामुळे घराकडे परतू लागलेल्या पूरग्रस्तांनी अजून थोडी वाट पाहावी. घरी परतू नये पाणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे, असे आवाहन महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे. तसेच व्यापाऱ्यांनीही दुकानातील माल, मौल्यवान वस्तू, अत्यावश्यक वस्तू पुन्हा दुकानात आणण्याची घाई करू नये, असे आवाहन महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()