कृष्णा कारखान्याची घाटमाथ्यावर नाही तोडणी यंत्रणा; ऊस नोंदीपासूनही शेतकरी वंचित

No harvesting system on the top of Krishna factory; Farmers are also deprived of sugarcane registration
No harvesting system on the top of Krishna factory; Farmers are also deprived of sugarcane registration
Updated on

वांगी (जि. सांगली) : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना प्रशासनाने सत्ताधारी मंडळींच्या दबावाखाली घाटावरील कडेगाव, खानापूर तालुक्‍यातील 23 गावांत यावर्षी अद्याप ऊसतोड यंत्रणा दिलेली नाही. शेतकऱ्यांकडून कायदेशीर अडचणी येऊ नयेत म्हणून यापूर्वीच नियोजन करून संबंधित गट कार्यालयात बहुतांशी सभासदांच्या उसाच्या नोंदीच घेतलेल्या नाहीत. यासंदर्भात काही शेतकरी सह्यांची मोहीम राबवून साखर आयुक्तांकडे दाद मागणार आहेत. 

या कारखान्याची निवडणूक तोंडावर आली असतानाही अशा प्रकारे कडेगाव तालुक्‍याकडे राजकीय दृष्टीने पाहून हा दुजाभाव केला जात असल्याबद्दल सभासदांतून नाराजी व्यक्त होत आहे. आम्ही सभासद आहोत. आमच्या उसाची नोंद घेणे आणि उसाला तोड देणे बंधनकारक आहे, असे सभासद शेतकरी सांगत आहेत. 

राजकीय साठमारीत सामान्य सभासद शेतकरी भरडला जात आहे. शेतकऱ्यांना सदैव राजकीय सूडबुद्धीचा त्रास होत आहे. लाभक्षेत्रातील सभासद शेतकऱ्यांच्या उसाच्या नोंदी स्वीकारणे बंधनकारक असताना घाटमाथ्यावरील बहुतांश शेतकऱ्यांवर कटकारस्थान करून उसाच्या नोंदीच घेतल्या जात नाहीत. अनेक शेतकरी उसाच्या नोंदी घेण्यासाठी अर्ज घेऊन कारखाना गट कार्यालयात जातात.

मात्र तरीही नोंद घेतली जात नाही. ज्यांनी गट कार्यालयातील कर्मचाऱ्यांना जाब विचारला त्या शेतकऱ्यांना उडवा उडवीची 
तोंडी उत्तरे मिळतात. संबंधित शेतकऱ्याला ऊसनोंदीपासूनच वंचित ठेवण्यात येते. कारखान्यात घाटावरील दोन संचालक निवडून गेलेत. सत्ताधाऱ्यांकडून दोघांच्याही शब्दाला "वाटाण्याच्या अक्षता' लावल्या जातात, अशी कुजबूज आहे. 

घाटावरील नोंद ऊस नेला जाईल

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याकडे यावर्षी तोडणी-वाहतूक यंत्रणा कमी आल्याने हा प्रश्न उद्‌भवत आहे. तरीही कशीबशी एक तोडणी-वाहतूक टोळी वांगी गटकार्यालयानुसार तोडणी सुरू आहे. आणखी यंत्रणा वाढविणेचे काम सुरू आहे. निश्‍चितच घाटावरील नोंद ऊस नेला जाईल

- ब्रिजराज ऊर्फ जितेंद्र मोहिते,  संचालक, य. मो. कृष्णा सह. साखर कारखाना

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.