छत्रपती घराण्यावर टीका खपवून घेणार नाही ; समर्थक कडाडले...

not tolerate criticism on Chhatrapati family say chhatrapati sambhaji raje
not tolerate criticism on Chhatrapati family say chhatrapati sambhaji raje
Updated on

कोल्हापूर  ः झोपेतून उठलेल्या खासदार संजय राऊत यांना खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मांडलेली भूमिका दिसली नाही काय, असा सवाल खासदार संभाजीराजे यांचे समर्थक योगेश केदार यांनी आज पत्रकार परिषदेत केला. छत्रपती घराण्यावर टीका सहन केली जाणार नाही, असाही इशारा त्यांनी दिला. 

"आज के शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तकावरून देशभर संतापाची लाट उसळली आहे. ठिकठिकाणी निदर्शने होत आहेत. याबाबत राऊत यांनी संभाजीराजेंवर टीका केली होती. याला आज प्रत्युत्तर म्हणून संभाजीराजेंचे समर्थक केदार यांनी पत्रकार परिषद घेतली. 

ते म्हणाले, ""दिल्लीमध्ये भाजप नेत्यांनी "आज के शिवाजी नरेंद्र मोदी' हे पुस्तक प्रकाशित केले. यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शिवाजी महाराजांच्या तुलनेतील पुस्तकावर राऊत यांनी ट्‌विट करून भूमिका मांडण्यापूर्वीच खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपली भूमिका सिंदखेडराजा येथे मांडली होती. मात्र झोपेतून उठून ट्‌वीट केलेल्या राऊत यांना ती दिसली नाही. राऊत यांनी महाभारतातल्या संजय सारखे सर्वज्ञ आहे असे वागू नये. त्यांच्यासह कोणीही छत्रपती घराणाऱ्यावर टीका करत असतील तर खपवून घेतली जाणार नाही. संभाजीराजे यांच्या अकाऊंटवरून एकेरी भाषेत केलेले ट्विट हे राजेंचेच आहे.'' 
पत्रकार परिषदेस फत्तेसिंह सावंत, उदय घोरपडे, संजय पवार, सोमनाथ लांबोरे, शैलेश गवळी, भरत कांबळे आदी उपस्थित होते. 


देशभर संताप 
छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना नरेंद्र मोदींशी पुस्तकाच्या माध्यमातून केल्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. खासदार संभाजीराजे यांनी या पुस्तकाबाबत आपला राग व्यक्त केला होता. तरीही राऊत यांनी ट्‌वीट करून संभाजीराजेंवर निशाणा ठेवला होता. खासदार राऊत यांच्या प्रतिक्रियेवर केदार यांनी सवाल उठवत राऊत यांनी माहिती घेऊन बोलावं. आपण काय महाभारतातील संजय नाही हे लक्षात घ्यावे, असेही केदार यांनी स्पष्ट केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.