White Ration Card Scheme : पांढऱ्या शिधापत्रिकाधारकांसाठी माेठी बातमी! आजपासून ५ लाखांपर्यंतचे मोफत उपचार

Ration Card Health Scheme : महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून पाच लाखांपर्यंत लाभ; ४० हजार रुग्णांवर मोफत उपचार
white Ration Card Health Scheme
White Ration Card Schemesakal
Updated on

सांगली : राज्य सरकारने महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून आता पांढऱ्या शिधापत्रिकाधारकांनाही पाच लाखांपर्यंतचे मोफत उपचार देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, त्याची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली. या निर्णयामुळे जिल्ह्यातील सर्वच नागरिकांना आता मोफत उपचार मिळणार आहेत.

राज्य शासनाने २०१२ पासून महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू केली आहे. यामध्ये दीड लाखापर्यंतचे उपचार मोफत मिळत होते. तर केंद्र सरकारने २०१८ पासून आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरू केली आहे. यातून पाच लाखांपर्यंत उपचार मोफत केले जातात. सन २०१९ मध्ये राज्य शासनाने या दोन्ही योजना एकत्र करून राज्यातील नागरिकांना पाच लाखांपर्यंतचे मोफत उपचार सुरू केले. या दोन्ही योजनांच्या माध्यमातून १३५६ विविध प्रकारच्या आधारावर मोफत उपचार केले जातात.

शिधापत्रिका लिंक करणे आवश्यक

महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी आयुष्यमान कार्ड काढणे आवश्यक आहे. त्यासाठी शिधापत्रिकाधारक कुटुंबांना आपली शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करणे आवश्यक आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड नंबर शिधापत्रिकेशी संलग्न असण्यासाठी त्याचे ऑनलाईन लिंक करण्याची गरज आहे.

white Ration Card Health Scheme
Ration Card KYC : बोगस धान्य वितरणाला बसणार आळा; रेशनकार्डधारकांना ई-केवायसी अनिवार्य

गतवर्षी ४० हजार रुग्णांवर उपचार

शासनाच्या या आरोग्य योजनेतून गेल्या आर्थिक वर्षात जिल्ह्यात ४० हजार रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले. यात सर्वाधिक लाभ कर्करुग्ण आणि हृदय रुग्णांना मिळाला. जिल्ह्यातील ३८ रुग्णालयांमध्ये शासनाची महात्मा फुले जन आरोग्य योजना राबवली जाते. या रुग्णालयांना गतवर्षी लाभार्थी रुग्णांवर केलेल्या उपचारापोटी जवळपास ९९ कोटी रुपयांचा परतावा मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.