त्या दोघांवर बलात्कारासह अनुसूचित जाती आणि जमाती (ॲट्रॉसिटी) अन्वये विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
सांगली : कोल्हापूर येथे असणाऱ्या परिचारिकेस लग्नाचे (Married) आमिष दाखवून सांगलीत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. अत्याचार करणारा आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या अशा दोघांवर विश्रामबाग पोलिस ठाण्यात (Vishram Bagh Police Station) गुन्हा नोंद करण्यात आला. सचिन संभाजी गायकवाड (वय २५, रा. घुणकी, ता. हातकणंगले) आणि अमोल कुरणे (कुंडलवाडी, ता. वाळवा) अशी संशयितांची नावे आहेत.