''काँग्रेसचे देशाचे नेते राहुल गांधी ओबीसींची जातनिहाय जनगणनेची मागणी करीत आहेत. महाराष्ट्रातील नेते ब्र काढायला तयार नाहीत.''
सांगली : विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) विजयी कोणाला करायचे, हे ठरले नसले तरी कोणाचा पराभव करायचा, हे ओबीसींनी नक्की ठरवले आहे. त्यामुळे या वेळची महाराष्ट्राची निवडणूक ओबीसी बांधवांच्या ताकदीचे प्रत्यंतर देणारी ठरेल, असा विश्वास ओबीसी आंदोलनाचे नेते प्रा. लक्ष्मण हाके (Prof. Laxman Hake) यांनी व्यक्त केली. त्यांच्या उपस्थितीत नेत्यांची बैठक झाली.