Devendra Fadnavis : दुष्काळ हटविण्यात काँग्रेसचा अडथळा

जत तालुक्याबद्दल सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते म्हणाले होते की, ‘जतला पाणी पोचले तर माझ्या कारखान्यात ऊसतोड कामगार मिळणार नाहीत. जतला पाणी देऊ नका.’
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSakal
Updated on

जत, (जि. सांगली) - ‘गेली अनेक वर्षे दुष्काळाचे राजकारण काही लोकांनी केले. जत तालुक्याबद्दल जिल्ह्यातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते म्हणाले होते की, ‘जतला पाणी पोचले तर माझ्या कारखान्यात ऊसतोड कामगार मिळणार नाहीत. जतला पाणी देऊ नका.’

एवढेच नाही तर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यांतील काही भाग त्या विचारांच्या नेत्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्षित ठेवला. तो कायम विस्थापित राहिला पाहिजे, असा त्यांनी प्रयत्न केला,’ अशी घणाघाती टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथील सभेत केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.