तीन दिवस महापुराच्या गाळात अडकलेल्या वृद्धाला जीवदान; उदगावात रेल्वे पुलावरुन मारली होती उडी
म्हैसाळ येथील अंबिकानगरमध्ये राहणारे अल्लाबक्ष मुल्ला हे घरातील किरकोळ वादामुळे मुलग्याकडे इचलकरंजीला जातो असे सांगून घरातून गुरुवारी बाहेर पडले होते.
जयसिंगपूर : आत्महत्या करण्यासाठी उदगाव (ता. शिरोळ) येथील रेल्वे पुलावरून (Railway Bridge) उडी मारलेल्या वृद्धाचा दैव बलवत्तर म्हणून तीन दिवस गाळात अडकूनही जीव बचावला. शेतकऱ्यांच्या (Farmers) सतर्कतेमुळे वृद्धाला गाळातून बाहेर काढत उपचारासाठी दाखल करण्यात आले. अल्लाबक्ष मुल्ला (वय ७४, म्हैसाळ, ता. मिरज) असे या वृद्धाचे नाव आहे.
उदगाव (ता. शिरोळ) येथील कृष्णा नदीवरील (Krishna River) रेल्वे पुलावरून गुरुवारी उडी मारलेले मुल्ला पुराच्या गाळात अडकून बसले होते. संजय मादनाईक यांच्यासह शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे शनिवारी (ता. १०) सकाळी त्यांना गाळातून बाहेर काढण्यात आले.
म्हैसाळ येथील अंबिकानगरमध्ये राहणारे अल्लाबक्ष मुल्ला हे घरातील किरकोळ वादामुळे मुलग्याकडे इचलकरंजीला जातो असे सांगून घरातून गुरुवारी बाहेर पडले होते. त्यानंतर ते थेट उदगाव येथील रेल्वे पुलावर आले आणि रेल्वे पुलावरून त्यांनी आत्महत्या करण्याच्या उद्देशाने नदीत उडी मारली. सध्या कृष्णा नदीतील पाण्याला प्रचंड वेग असून मुल्ला हे वाहत पुलापासून पुढे गेले. नदीच्या काठाला पुरामुळे मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून यात झुडपाच्या परिसरात गुरुवारी सकाळच्या सुमारास ते गाळात अडकून बसले होते.
गुरुवारीच पूर उतरल्याने शेतात जाता येत नसल्याने शेतकरीही नदीकाठाला गेले नाहीत. शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास अक्षय मादनाईक, संजय मादनाईक व राजकुमार मादनाईक शेतात काम करत असताना मुल्ला यांच्या ओरडण्याचा आवाज आला. घटनास्थळी धाव घेऊन झुडपाच्या परिसरात गाळामध्ये अडकलेल्या मुल्ला यांना त्यांनी बाहेर काढले. अक्षय मादनाईक, सागर कदम, शुभम गायकवाड, डॉ. शुभम तायडे यांच्यासह शेतकऱ्यांनी रुग्णवाहिकेतून त्यांना तातडीने सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.